Shivshahi Bus Fire | भरधाव शिवशाहीला आग; चालकाच्या प्रसंगावधानाने 44 प्रवासी थोडक्यात बचावले

Shivshahi Bus Fire

अकोला : Shivshahi Bus Fire | शेगाव येथून अकोल्याकडे (Shegaon To Akola) येत असलेल्या भरधाव शिवशाहीने अचानक पेट घेतल्याची घटना आज (दि. २५) दुपारी एक वाजताच्या सुमारास रिधोरा नजीक घडली. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील ४४ प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. बस मात्र पूर्णपणे जळून खाक झाली.

अकोला क्र -२ आगारातील एमएच ०९ इएम १७९२ क्रमांकाची शिवशाही बस सकाळी अकोला येथून शेगावकडे गेली होती. विनावाहक असलेली शिवशाही बस चालक पी एन डोंगरे शेगाव येथून परत घेऊन येत असताना रिधोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर आली असता तांत्रिक कारणामुळे चालकाच्या कॅबिनमध्ये अचानक आग लागली.

आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवली. व सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशामक यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. पाहता पाहता संपूर्ण बस जळून खाक झाली. (Shivshahi Bus Fire)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Rains | पुण्यात पावसाचा हाहाकार! सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत पाणी; NDRF चे पथक मदतीसाठी दाखल

Lavasa Landslide | लवासामध्ये दरड कोसळल्याने 2 व्हिला गाडले गेले; तीन ते चार जण बेपत्ता

Pune Rainfall Update | पुणेकरांसाठी आणखी धोक्याची घंटा; हवामान विभागाकडून इशारा; रेड अलर्ट जारी

You may have missed