Shobhatai R Dhariwal | “वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मनुष्य जातीचे प्राण”; शोभाताई आर धारिवाल

पुणे : Shobhatai R Dhariwal | दरवर्षी 1 मार्च रोजी रसिकलाल मा. धारीवाल (Rasiklal M Dhariwal) यांच्या जन्मदिनानिमित्त “रक्तदान सोहळा” (Blood Donation Camp) आयोजित केला जातो या आधीही त्यांच्या जन्मदिनानिमित्त पुण्यामध्ये विविध रक्तदान केंद्रांवर एकाच दिवशी २४,000 ब्लड बॅग्स संकलन करण्याचा विक्रम आर एम डी फाउंडेशनने (RMD Foundation) केलेला आहे, हि परंपरा आजही नियमितपणे पाळल्या जाते.
तसेच आर एम डी फाउंडेशन द्वारा मागील 30 वर्षांपासून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन कार्यक्रम निरंतर चालू आहे श्री रसिकलाल धारीवाल साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त “एक लाख झाडं लावण्याची योजना” असेल किंवा “पुलकछाया योजने” अंतर्गत भारतभर वृक्ष लागवड असेल किंवा “एक झाड आईच्या नावाने” योजना असेल तेव्हा आर एम डी फाउंडेशन द्वारा शेकडो वृक्ष लागवड व संवर्धन कार्यक्रम राबविण्यात आलेले आहे आज काळाच्या बदलत्या गरजेनुसार फाउंडेशनने “ट्री ट्रान्सप्लांटेशन योजना” राबविण्यात सुरुवात केलेली असून पुणे रिंग रोड प्रकल्पात शेकडो वृक्षांना कापण्यापासून वाचवून उपलब्ध जागेत स्थानांतर करून अनेक वृक्षांचे प्राण वाचविण्याचे काम सुरु झालेले आहे.
आजच्या प्रसंगी ” वृक्ष लागवड आणि रक्तदान वाचवी मानवाचे प्राण” अशी भावना शोभाताई रसिकलाल धारिवाल यांनी व्यक्त केली.
दिनांक १ मार्च २०२५ शनिवार रोजी श्री रसिकलाल साहेबांच्या जन्मदिनानिमित्त जास्तीत जास्त पुणेकरांनी आर एम डी बंगला नंबर ६४, लेन नंबर ३ कोरेगाव पार्क-पुणे येथे उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अधिक माहितीसाठी 7353354444 या क्रमांकावर संपर्क साधावा. (Shobhatai R Dhariwal)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण