Shree Salasar Hanuman Chalisa Mandal Pune | पुणे: श्री सालासर हनुमान चालिसा मंडळाकडून वारकऱ्यांसाठी मोफत फिजिओथेरपी कॅम्प

Shree Salasar Hanuman Chalisa Mandal Pune

पुणे : Shree Salasar Hanuman Chalisa Mandal Pune | पुण्यातील श्री सालासर हनुमान चालिसा मंडळाच्या वतीने “वारकरी चरण सेवा हीच पांडुरंगाची सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकरून गेल्या 8 वर्षांपासून शास्त्रोक्त पद्धतीच्या मोफत फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन पालखी विसावा झेंडेवाडी, सासवड या डोंगरमाथ्यावर करण्यात येते. (Warkari In Pune)

यावर्षी श्री सालासर हनुमान चालिसा मंडळ, पुणे तसेच श्री बालाजी भजनी मंडळ, कसबा पेठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवारी (दि. 2) हे शिबीर पार पडले. या शिबिरात समाजातील अनेक लोकांनी सहभाग घेऊन आपली सेवा दिली. घाटमाथा चढून येणाऱ्या वारकऱ्यांचे प्रथमतः गरम पाण्याने पाय शेकले जातात. त्यानंतर त्या वारकऱ्यांना मंडळातील सदस्य तसेच फिजियोथेरपीस्ट डॉक्टरांच्या साह्याने योग्य तो मसाज दिला जातो. आलेल्या प्रत्येक वारकऱ्यांना पेनकिलर ट्यूब चे वाटप करण्यात येते. (Palkhi Sohala 2024)

या आरोग्य शिबीराचा सुमारे पाच ते साडेपाच हजार वारकऱ्यांनी या सेवेचा लाभ घेतला. यावेळी मंडळातर्फे सुमारे 5 हजार वारकरी बंधू भगिनींना पेन किलर ट्यूबांचे वाटप करण्यात आले. तसेच सुमारे 6 हजार लिटर मोफत मिनरल वॉटर बॉटल्स चे वाटप करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमाला अभिजीत घेवडे, गायत्री मेडिकल्स पुणे दिलीप बुब परिवार,
तसेच सालासर हनुमान चालीसा मंडळातील सर्व सदस्यांनी वर्गणी काढून यांनी आर्थिक खर्च गोळा केला.
तसेच वस्तूरुपी मदद हि MSN ट्रेडिंग कंपनी, पुणे यांनी केली, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फिजियोथेरपी,
पुणे येथील फिजियोथेरपिस्ट डॉक्टरांनी सेवा दिली.
उदय देशमुख यांनी झेंडेवाडी येथील जागा उपलब्ध करून दिली. तसेच पवार डेकोरेशन यांनी मंडप उभारले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : टिंडर डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड

Fix Deposit Interest Rates | HDFC आणि Axis बँकेने ग्राहकांना दिली भेट, या लोकांना होईल फायदा

Anant-Radhika Wedding | सोनिया गांधी, राहुल… कोणा-कोणाला मुकेश अंबानी यांनी दिले निमंत्रण, ही आहे गेस्ट लिस्ट

You may have missed