Shri Salasar Hanuman Chalisa Mandal | पुण्यात संगीतमय हनुमान चालीसा पठणास उत्स्फूर्त प्रतिसाद

Shri Salasar Hanuman Chalisa Mandal | Spontaneous response to musical Hanuman Chalisa recitation in Pune

पुणे : Shri Salasar Hanuman Chalisa Mandal | श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, पुणे यांच्या वतीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या संगीतमय हनुमान चालीसा पठण कार्यक्रमास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

https://www.instagram.com/p/DWD3AefCa2q

काल दिनांक १८ मार्च २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता कसबा पेठ येथील नवग्रह मित्र मंडळ येथे हा भक्तिमय कार्यक्रम पार पडला. हनुमान भक्तीमध्ये तल्लीन होऊन उपस्थितांनी सामूहिकरित्या चालीसा पठण केले, ज्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या कार्यक्रमास सुमारे ७०० ते ८०० हनुमान भक्तांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे, श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ गेल्या २० वर्षांपासून पुण्यातील विविध मंदिर, सोसायटी व मंडळांमध्ये महाशिवरात्री ते हनुमान जन्मोत्सव या कालावधीत दररोज ११ वेळा संगीतमय हनुमान चालीसा पठण करण्याची परंपरा सातत्याने जोपासत आहे.
सदर कार्यक्रमाचे आयोजन नवग्रह मित्र मंडळ, कसबा पेठ, पुणे तसेच संपूर्ण मुंदडा परिवार, कसबा पेठ, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते.

You may have missed