Shrikant Kolhapure Arrest | सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत कोल्हापूरे यांना अटक

Shrikant Kolhapure Arrest

मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी घेतले 1 कोटी, सीआयडीने आपल्याच अधिकार्‍यावर केली कारवाई

पुणे : Shrikant Kolhapure Arrest | महाबळेश्वर येथील हाटेल व्यावसायिकाला मद्यविक्री परवाना मिळवून देण्यासाठी अडीच कोटींची मागणी करुन १ कोटी ५ लाख रुपये घेणार्‍या सीआयडीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकाला सीआयडीने (Pune CID Addl SP Arrest) अटक केली आहे. (Cheating Fraud Case)

श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे (Shrikant Namdevrao Kolhapure) असे अटक केलेल्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर येथील हेमंत बाळकृष्ण साळवी यांचे मेघदूत हॉटेल आहे. या हॉटेलसाठी मद्यविक्री परवाना मिळवून देतो, असे सांगून श्रीकांत कोल्हापूरे याने त्याचे मित्र हनुमंत मुंडे, अभिमन्यू रामदास देडगे, बाळु बाबासाहेब पुरी यांनी हॉटेलचालकाकडे २ कोटी ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी १ कोटी ५ लाख रुपये घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे हॉटेल मालकाच्या लक्षात आले. त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे (Criminal Investigation Department Maharashtra) पोलीस महासंचालकांकडे तक्रार अर्ज केला होता.

या अर्जाची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने केली. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात (Wai Police Station) गुन्हा दाखल करुन संशयित हनुमंत विष्णुदास मुंडे (Hanumant Vishnudas Munde), अभिमन्यू रामदास देडगे (Abhimanyu Ramdas Dedge) व बाळु बाबासाहेब पुरी (Balu Babasaheb Puri) यांना सीआयडीने अटक केली.

गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीकांत कोल्हापूर हा फरार झाला होता. सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक गणेश माळी (DySP Ganesh Mali),
पोलीस निरीक्षक वर्षा कावडे (PI Varsha Kavade), पोलीस अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर,
जमीर मुल्ला व स्वप्नील जाधव यांच्या पथकाने श्रीकांत कोल्हापूरे याला ठाणे येथून अटक केली.
त्याला वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले (Manisha Dubule) तपास करीत आहेत, (Shrikant Kolhapure Arrest)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | डिलेव्हरी बॉईजचा राडा ! डिलेव्हरी बॉईजनी सुरक्षारक्षकाला केला जीवे मारण्याचा प्रयत्न (CCTV Video)

Maharashtra Assembly Election 2024 | शिवसेना आणि राष्ट्रवादीमुळे भाजपची गोची; नेत्यांची बंडखोरी रोखण्याचे आव्हान; डोकेदुखी वाढली

Shivaji Nagar Pune Crime News | बनावट 7/12 सादर करुन न्यायालयाची फसवणूक करणार्‍या महिलेवर गुन्हा दाखल

Pimpri Chinchwad Crime Branch News | पिस्तुल बाळगणार्‍या तरुणाला अटक ! गावठी कट्टा, 2 जिवंत काडतुसे जप्त

You may have missed