Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास; भाविकांची दर्शनासह सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी

पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती. (Bhau Rangari Ganpati)
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिरात बाप्पाला निळ्या आणि काळ्या द्राक्षाचा नैवद्य वाढवून त्यातून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या द्राक्षांचे पुण्यातील ‘सुर्योदय फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला वाटप करण्यात आले. (Shrimant Bhausaheb Rangari Ganpati)