Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा
वाजत-गाजत निघणार बाप्पाची मिरवणूक
पुणे : Shrimant Bhausaheb Rangari Ganpati | हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाची (Bhau Rangari Ganpati) प्राणप्रतिष्ठा प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या हस्ते होणार शनिवारी (दि. ७) दुपारी साडेबारा वाजता होणार आहे., त्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात आणि जंगी मिरवणूक देखील निघणार आहे.
मंडळाचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन (Punit Balan) यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गणेश चतुर्थीला सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी बाप्पाची आरती होईल. त्यानंतर मिरवणुकीला सुरवात होईल. सुरवातिला लाठीकाठी मर्दानी खेळ व शंखनाद होईल. त्यांनतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी दिली जाणार आहे. शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु म वी, कलावंत, श्रीराम ही सात ढोल ताशा पथके बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी असणार आहेत. या सर्व पथकांच्या वादन मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या बाप्पाचे वाजत गाजत आगमन होणार आहे. विशेष म्हणजे १३२ वर्षानंतर प्रथमच यावर्षी बाप्पाच्या रथाला बैलजोडी न लावता कार्यकर्ते हा रथ ओढणार आहेत. दुपारी साडेबारा वाजताच्या मुहर्तावर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यक्रम होतील असे पुनीत बालन यांनी सांगितले.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची वाजत-गाजत मिरवणुकीनंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तरी सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहावे ही विनंती.
पुनीत बालन (उत्सव प्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा