Sihagad Road Pune Crime News | घटस्फोटात मध्यस्थी करणे ज्येष्ठ नागरिकास पडले महागात; फायटरने मारुन केले जखमी

पुणे : Sihagad Road Pune Crime News | भाचा व त्याची पत्नी यांच्या घटस्फोटाच्या दाव्यात मध्यस्थी करणे एका ज्येष्ठ नागरिकास चांगलेच महागात पडले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना फायटरने मारहाण करुन जखमी केले.
याबाबत नांदेडफाटा (Nanded Fata) येथे राहणार्या एका ५९ वर्षाच्या नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Raod Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अजिंक्य राजाभाऊ कदम (Ajinkya Rajabhau Kadam), तुषार दिलीप पवार (Tushar Dilip Pawar), गौरी तुषार पवार Gauri Tushar Pawar (सर्व रा. कात्रज) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडगाव खुर्द (Vadgaon Khurd) येथील स्नेहल अपार्टमेंटसमोर शनिवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाचा व त्यांची पत्नी यांच्या चालू असलेल्या घटस्फोटाचे दाव्याच्या वादात फिर्यादी यांनी मध्यस्थी केली होती. त्या कारणावरुन आरोपी हे शनिवारी रात्री त्यांच्याकडे आले होते. अजिंक्य कदम याने फायटर हाताचे मुठीमध्ये ठेवून फिर्यादी यांच्या गालावर बुक्की मारुन जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांची भावजय व तिचा मुलगा हे फिर्यादी यांना सोडविण्यास आले असताना तुषार पवार याने त्याला हाताने मारहाण केली. गौरी हिने भावजय यांना हाताने मारहाण करुन धक्काबुक्की करुन ढकलून दिले. हवालदार गवळी तपास करीत आहेत. (Sihagad Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | मेंदूतील रक्तस्त्रावाने पोलीस कोठडीतील आरोपीचा मृत्यु