Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
सिंधुदुर्ग : Sindhudurg Crime News | सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करत पोलीस दलामध्ये शिपाई पदावर भरती करुन देतो असे आमिष दाखवत लाखों रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संदीप गुरव यांच्यावर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात (Sindhudurg Nagari Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रादार हे सद्या सेवानिवृत्त असून ते अबकारी विभाग (राज्य उत्पादन शुल्क विभाग, पेडणे गोवा) कार्यरत असताना माहे डिसेंबर / २०२२ मध्ये पत्रादेवी चेकपोस्टवर कर्तव्यावर असतांना त्या दरम्यान यातील आरोपी हा गोवा येथे जात असतांना सदर चेकपोस्टवर तक्रारदार यांनी त्याचे वाहन थांबवून चौकशी केली असता त्यावेळी आरोपीने स्वतःची ओळख डॉ. संदीप गुरव, कोल्हापूर, पी.एस.आय. अशी करुन देत विश्वास संपादन करत तक्रारदार यांची कौटुंबिक माहीती घेतली व तक्रारदार यांच्या मुलास पोलीस शिपाई पदावर नोकरीस लावतो असे आमिष दाखवत तक्रारदार यांचेकडून वेळोवेळी टप्याटप्याने व वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६,४७,०००/- रोख व चेक स्वरुपात घेतले.
त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपीला नोकरी बाबत विचारणा केली असता, आरोपी तक्रारदार यांना वेगवेगळे कारणे देऊन टाळाटाळ करीत होता. दरम्यान तक्रारदार माहे जुलै २०२४ मध्ये कुटंबासह टिव्ही वरील बातम्या पाहत असतांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाणे, खडकी (जि. पुणे) येथे दाखल गुन्हयामध्ये आरोपीचा फोटो व नांव संदीप गुरव यास अटक करण्यात आल्याबाबत वृत्त पाहिले असता. त्यांना आपली फसवणूक झाल्याचे आल्या ने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात सध्या सुरु असलेल्या
पोलीस भरतीमध्ये कोणीही पोलीस दलातील अगर बाहेरील व्यक्तीने भरतीमध्ये उमेदवाराला मदत किंवा निवड करतो असे आश्वासन देऊन पैशाची / लाचेची मागणी केली
तर उमेदवाराने त्यास बळी न पडता त्याबाबत पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
यांचेकडे दुरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष तक्रार करणेबाबत त्याचप्रमाणे वर्तमानपत्रामध्ये व
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर वेळोवेळी आवाहन करण्यात आलेले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | आंदेकर टोळीतील गुंडांकडून तरुणावर हल्ला; एकास अटक
Sassoon Hospital | धक्कादायक! ससून रुग्णालयातील डॉक्टरांकडून बेवारस रुग्णासोबत अमानवी कृत्य