Sindhudurg Crime News | अनैतिक संबंधात अडथळा; प्रियकर आणि त्याच्या दोन भाच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, खून लपवण्यासाठी केला वेगळाच बनाव

Murder For Immoral Relationship

सिंधुदुर्ग : Sindhudurg Crime News | प्रियकराशी असलेल्या अनैतिक संबंधात पतीचा असलेला अडथळा दूर करण्यासाठी पत्नीने प्रियकर आणि त्याच्या दोन भाच्यासह पतीचा निर्घृण खून केल्याची घटना समोर आली आहे. हा खून लपवण्यासाठी पत्नीने आत्महत्येचा बनाव केला होता. पूर्वनियोजित कट रचून शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णाप्पा नायक (वय-२८, रा. कुडाळ, मूळ रा. विजापूर, राज्य कर्नाटक) याचा खून करण्यात आला. (Murder For Immoral Relationship)

दरम्यान याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१),२३८,६२(२) (ए) प्रमाणे सुनंदा उर्फ सोनाली शिवाप्पा नायक (वय-२५),सिताराम बाबू राठोड (वय-३०), अजित अशोक चव्हाण (वय-२१), अदिक अशोक चव्हाण (वय-१९), (सर्व सध्या राहणार कुडाळ, मूळ रा. काळगीतांडा, विजापूर) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी सुनंदा हिला कर्नाटक येथून अटक करून कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील इतर तिघे फरार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ शहरामध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय करणारा शिवा उर्फ शिवाप्पा कृष्णाप्पा नायक याने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची फिर्याद शिवा नायक हिच्या बहिणीने कुडाळ पोलिसात दिली होती. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा करत तशी आत्महत्येची नोंद दाखल केली होती. यानंतर मयत शिवा याच्यावर विजापूर येथील गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र कुडाळ शहरात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. ४ जानेवारी रोजी शिवाच्या भावाने या आत्महत्येबाबत संशय व्यक्त करणारा एक अर्ज कुडाळ पोलिसांकडे दिला होता. यानंतर कुडाळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

दरम्यानच्या काळात पोलिसांच्या हाती पत्नी सुनंदा हिची एका व्यक्तीबरोबर झालेली चर्चेची एक ऑडिओ क्लिप हाती लागली. मात्र ही ऑडिओ क्लिप त्यांच्या बंजारी भाषेत असल्याने पोलिसांना या तपास कामात अडथळा येत होता. यासाठी पोलिसांनी संबंधित भाषा जाणणाऱ्या दोन प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन त्याचे भाषांतर केले. हे भाषांतर ऐकल्यानंतर पोलिसांच्या संशयाचे रूपांतर पुराव्यात झाले. यानंतर पोलिसांनी पत्नी सुनंदा हिच्या गावी जात तिला ताब्यात घेतले.

पोलीस चौकशीत सुरुवातीला तिने पोलिसांना वेगवेगळ्या बतावण्या केल्या. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच तिने आपण प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबुली दिली. तिने दिलेल्या जबाबानुसार २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास प्रियकर सिताराम राठोड यांने सुनंदाला फोन करून आज रात्री शिवा नायकचा काटा काढायचा असे सांगितले. यानंतर या दोघांमध्ये हे कृत्य कसे करायचे? याबाबत चर्चा झाली.

त्यानुसार सिताराम राठोड हा आपले दोन भाचे अजित चव्हाण व आदिक चव्हाण यांच्यासह घरी आला. यातील सितारामने त्याचे पाय पकडले व अन्य दोघांपैकी एकाने जाड कापडाने शिवाचे नाक व तोंड दाबले तर दुसऱ्याने दोरीने गळा आवळला. यानंतर हे तिघेही घटनास्थळावरून निघून गेले. यानंतर पत्नीने आपल्या प्रियकराला वाचवण्यासाठी व तिच्या समोर झालेला खून लपविण्यासाठी पतीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. त्याने आत्महत्या केली असे दिसावे यासाठी किचनमध्ये साडीचा केवळ नामधारी गळफास तयार केला होता.

घडलेल्या घटनेवरून उलटसुलट चर्चा सुरू असताना पोलिसांचाही संशय बळावला होता.
आत्महत्येचा बनाव रचल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.
त्यावेळी पत्नीने आपण स्वतःच पती शिवाला गळफासावरून खाली उतरवले असे सांगितले.
मात्र एकटी महिला एका वजनशीर व्यक्तीला खाली उतरू शकत नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.
त्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले असता चौकशीत माहिती समोर आली.
या घटनेची फिर्याद पोलिस हवालदार सचिन गवस यांनी दिली.
घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम करत आहेत. (Sindhudurg Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

ACB Trap On Sanjay Gunjal | अडीच लाखांची लाच घेताना फलोत्पादन उपसंचालकाला केली अटक;
एफआरआय न करण्यासाठी मागितली होती तीन लाखांची लाच

ACP Transfers Pune Police | पुण्यातील सहा सहायक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या;
फरासखाना, हडपसर, खडकी विभाग आणि वाहतूक शाखेत नेमणूका

You may have missed