Singer Pushpa Chaudhary | अभिनेत्री आणि गायिका पुष्पा चौधरी यांनी केला सलग 51 मराठी पारंपारिक लावणी गायनाचा विश्वविक्रम

Singer Pushpa Chaudhary

पुणे : Singer Pushpa Chaudhary | वूमेन्स इम्पॉवेरमेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सोहळ्यात मराठी लावणी संगीत जगाच्या पटलावर यावी आणि लावणीला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी अभिनेत्री आणि गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग ५१ मराठी पारंपारिक लावणी गायनाचा विश्वविक्रम केला आहे. सलग ४ तास ४५ मिनिटे पुष्पा चौधरी यांनी लावणीची गाणी सादर करून विश्वविक्रम केला. कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या सोहळा पार पडला.

पुष्पा चौधरी यांनी सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुरुवात करून दुपारी २ वाजून ४६ मिनिटांनी शेवटची ५१ वी लावणी गायली. या कार्यक्रमात वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे प्रतिनिधी दिनेश पैठणकर आणि वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल च्या प्रतिनिधी नीता दोंदे टिपणीस यांनी या विश्वविक्रमाची नोंद घेत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन पुष्पा चौधरी यांचा सन्मान केला.

You may have missed