Sinhagad Raod Pune Crime News | धक्कादायक ! लघुशंका करणार्यांना अटकाव करणार्या पती-पत्नीवर तिघांकडून कोयत्याने वार; AD भाईच्या मुलांचे कृत्य

पुणे : Sinhagad Raod Pune Crime News | पतीपत्नी कट्ट्यावर बसलेले असताना त्यांच्या शेजारी उभे राहून लघुशंका करणार्या तरुणाला हटकले. या कारणावरुन तीन तरुणांनी पत्नीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. पतीला पकडून आम्ही येथेच लघवी करणार, आम्ही ए डी भाईची मुले आहोत. मला अडवणार काय, आज तुझी विकेटच टाकतो, असे बोलून पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शास्त्रीनगर चौकात शनिवारी सकाळी घडलेल्या घृणास्पद प्रकाराची सर्वत्र चर्चा झाली़ पण, सिंहगड रोडवरील वडगाव येथे घडलेल्या या प्रकाराकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
याबाबत धायरी येथील महादेवनगर येथे राहणार्या ३७ वर्षाच्या महिलेने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती हे शुक्रवारी सायंकाळी कामावरुन दुचाकीने घरी निघाले होते. क्षेत्रिय कार्यालयाचे समोरील बाजुला असलेल्या कट्ट्यावर बसून ते गप्पा मारत होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ते बसलेल्या कट्ट्याचे जवळ एक दुचाकी थांबली. त्या दुचाकीवरुन तिघे जण उतरले. त्यापैकी एक जण त्यांच्या शेजारीच उभा राहून लघुशंका करु लागला. तेव्हा फिर्यादीचे पतीने त्याला लेडीजसमोर लघवी करतोस असे विचारले. त्यावर तो मुलगा शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी महिलेने तुम्ही आम्हाला शिव्या का देता, असे विचारले. त्यांच्या पैकी पिस्ता कलरचा चेक्स शर्ट घातलेल्याने मुलाने पतीला धक्का मारला.
कमरेला लावलेला कोयता काढून तो उलटा करुन फिर्यादी यांच्या हाताचे पोटरीवर मारला. त्यांचा गळा पकडला. त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्याचे पती त्यांना सोडविण्याकरीता मध्ये आले असताना एकाने पतीला पाठीमागून पकडले. दुसर्याने ‘‘वडगाव आमच्या भाईचे आहे, आम्ही येथेच लघवी करणार, कोण आम्हाला आडवतो, तेच बघतो, तु मला अडवणार काय, आजच तुझी विकेटच टाकतो,’’ असे म्हणून हातातील कोयत्याने पतीच्या डोक्यात वार केला. पतीने तो वार चुकविण्याचा प्रयत्न केला. पण,तो डोक्याच्या मागील बाजूला लावून ते जखमी झाले. त्यांच्यासोबतच्या तिसरा शिवीगाळ करु लागला. त्यांच्या आवाजाने नागरिकांची गर्दी होऊ लागल्याने ते तिघे पळून गेले. पुढे जाऊन त्यांनी हातातील कोयते हवेत नाचवत गोंधळ घालून लोकांना धमकावले. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे, पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकाºयांनी घटनास्थळाला भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले तपास करीत आहेत. (Sinhagad Raod Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण