Sinhagad Road Pune Crime News | जादा परताव्याचे आमिष दाखवून 2 कोटींची फसवणूक; वरद प्रॉपर्टीजचे महेश कुंटे यांच्यावर गुन्हा दाखल

fraud

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | कंपनीमध्ये गुंतवणुक केल्यास अधिक परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ९५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) वरद प्रॉपटीज सोल्युशन कंपनीच्या (Varad Properties Solution Company) संचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

महेश विजय कुंटे Mahesh Vijay Kunte (वय ५१), अपर्णा महेश कुंटे Aparna Mahesh Kunte (वय ४८, दोघे रा. कृष्णा रेसिडेन्सी, हॉटेल वाडेश्वर मागे, लॉ कॉलेज रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत.

याबाबत सदाशिव बाळकृष्ण कुलकर्णी (वय ६४, रा. सन सॅटेलाईट, सनसिटी रोड, वडगाव) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वरद प्रॉपर्टीज सोल्युशन प्रा. लि. च्या नवले आयटी झोन येथे २०१९ ते २०२४ दरम्यान घडल. आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरद प्रॉपर्टीज सोल्युशनचे संचालक महेश कुंटे याने फिर्यादी यांना २०१९ मध्ये अधिक परताव्याचे आमिष दाखविले. त्यामुळे फिर्यादी यांनी आतापर्यंत १ कोटी ७६ लाख रुपयांची गुंतवणुक त्यांच्याकडे केली. या गुंतवणुकीवर १९ लाख ५२ हजार रुपये देण्याचे वचनपत्रान्वये कबुल केले होते. असे असतानाही कोणताही परतावा न देता त्यांची १ कोटी ९५ लाख ५२ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. अर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगर तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवणं शिवसेना शिंदे गटाच्या अंगलट, चौकशी होणार; शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Baramati Assembly Election 2024 | ‘तीन ठिकाणांवरून ऑफर होती, यंदा बारामतीतून उभा राहणार नव्हतो’, अजित पवारांचे वक्तव्य

Pune Crime News | भागीदारीतील कंपनीतून मेटरियल घेऊन स्वत:च्या कंपन्यांमार्फत विक्री करुन 2 कोटी 31 लाखांची फसवणूक

You may have missed