Sinhagad Road Pune Crime News | 16 वर्षाच्या मुलाने ज्येष्ठाच्या डोक्यात दगड घालून केला जीवे मारण्याचा प्रयत्न

marhan

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | गुळण्या करताना शेजारी असलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडावर पाणी उडाले. त्यांनी चापट मारल्याच्या रागातून १६ वर्षाच्या मुलाने तुला खल्लास करतो, थेरड्या असे म्हणत ज्येष्ठ नागरिकाच्या डोक्यात दगड मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Murder). या घटनेत बाशीर हैदर चौधरी (वय ६८, रा. गणेश कॉलनी, महादेवनगर, सिंहगड रोड) हे गंभीर जखमी झाले आहे. (Sinhagad Road Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAP-13RCnoZ

याबाबत समीर बाशीर चौधरी (वय ४०, रा. महादेवनगर, सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका १६ वर्षाच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना महादेवनगरमधील गणेश कॉलनी (Ganesh Colony Mahadevnagar Pune) येथील गोल्डन चिकन सेंटरजवळील दुचाकी गॅरेज दुकानासमोर शनिवारी रात्री सव्वाआठ वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DAP6t1Jify8

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडिल बाशीर चौधरी हे दुचाकी गॅरेजसमोर उभे होते. अल्पवयीन मुलगा बाशीर चौधरी यांच्या शेजारी उभा राहून गुळण्या करीत होता. त्यावेळी त्याने तोंडातील पाणी बाशीर यांच्या अंगावर उडवले. तेव्हा बाशीर चौधरी यांनी या मुलाच्या कानाखाली मारुन त्याला जाब विचारला. त्यावर राग येऊन या मुलाने तुला खल्लास करतो थेरड्या अशी धमकी देऊन दगड उचलून बाशीर चौधरी यांच्या डोक्यात घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बाशीर चौधरी यांच्यावर उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAP8MayJJyy

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Dhangar Reservation GR | “…तर राज्यातील 60-65 आमदार राजीनामा देतील”; महायुतीतल्या नेत्याचे मोठे वक्तव्य

Maharashtra Politics News | महायुतीतून अजित पवार बाहेर पडणार? विधानसभेपूर्वी राजकीय घडामोडींना वेग

Sharad Pawar Vs Ajit Pawar | अजित पवारांच्या ६ आमदारांबाबत शरद पवारांचे प्लॅनिंग; राजकीय सामना रंगणार

Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर आयोजित महिला मेळाव्याला 4 हजार भगिनींची उपस्थिती; सर्व महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरले (Video)

You may have missed