Sinhagad Road Pune Crime News | मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने अकाउंट, सिंहगड रोडवर कोयत्याने वार करत हल्ला (CCTV Video)
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | शहरात गुन्हेगारीने पुन्हा तोंड वर काढले आहे. सातत्याने गुन्ह्यांच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता सिंहगड रस्त्यावर आज (दि.४) सकाळी कोयत्याने तरुणावर हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पूर्ववैमन्यासातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सागर चव्हाण असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मे महिन्यात पुण्यातील डहाणूकर कॉलनी परिसरात एकमेकांकडे बघितल्यावरून दोन गटात भांडण झाले होते. त्याचवेळी एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले होते. या हल्ल्यात त्याचा मृत्यू देखील झाला होता. श्रीनिवास वतसलवार असे या तरुणाचे नाव होते. ज्या तरुणांनी श्रीनिवास वर हल्ला केला त्यापैकी सागर चव्हाण एक होता. (Sinhagad Road Pune Crime News)
आज किरकटवाडी भागात सागर चव्हाणला एका मित्राने बोलावून घेतलेले होते. दरम्यान दोघा जणांकडून त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये सागर चव्हाण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती नाजूक असल्याची माहिती आहे.
सागर चव्हाण याला मारण्यासाठी आरोपींनी एक अनोखा प्लॅन तयार केला होता.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपींनी सोशल मीडियावर एका मुलीच्या नावाने अकाउंट तयार केले होते.
या अकाउंट वरून सागरला अनेक मेसेज देखील करण्यात आले होते.
आपल्याशी रोज बोलत असल्यामुळे सागर या अकाउंटच्या प्रेमात पडला होता.
हे अकाउंट आरोपी चालवत असल्याची कुठलीही कुणकुण त्याला लागली नव्हती.
महिनाभर चॅटींग केल्यानंतर आज आपण भेटू असे सागरला सांगण्यात आले.
आज सकाळी सागर याला भेटायला बोलावले आणि त्याच्यावर हा जीवघेणा हल्ला करण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Gultekdi Pune Crime News | पुणे : गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन;
भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, 5 जणांना अटक