Sinhagad Road Pune Crime News | पुणे: पेट्रोल चोरीच्या संशयातून मारहाण केलेल्या २० वर्षीय तरुणाचा मृत्यु; पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या पण माजी उपसरपंच सुशांत कुटे ‘फरार’

Samarth Bhagat

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | एका गाडीतून पेट्रोल काढून दुसर्‍या गाडीत टाकत असताना पेट्रोल चोर असल्याच्या संशयातून बेदम मारहाण केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यु झाला. पोलिसांनी या अगोदर खुनाचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली होती. त्यात आता खुन हे कलमवाढ करण्यात आले आहे. (Sinhagad Road Pune Crime News)

समर्थ नेताजी भगत Samarth Netaji Bhagat (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, नर्‍हे) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव संजय कुटे Gaurav Sanjay Kute (वय २४), अजिंक्य चंद्रकांत गांडले Ajinkya Chandrakant Gandle (वय २०), राहुल सोमनाथ लोहार Rahul Somnath Lohar (वय २३, रा. मानाजीनगर, नर्‍हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे (Sushant Suresh Kute) हे फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी समर्थचे वडिल नेताजी भगत यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली आहे. ही घटना २५ नोव्हेबर रोजी पहाटे ६ वाजता घडली होती. समर्थ हा डेक्कन येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. समर्थ याला पहाटे जायचे होते. त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसर्‍या गाडीतील पेट्रोल काढत होता. त्यावेळी आरोपींना त्याला पेट्रोल चोर समजून लाथाबुक्क्यांनी, काठीने तसेच सायकलच्या चैनने बेदम मारहाण केली.

त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पाच दिवस उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच समर्थची प्रकृती खालावत गेली. रविवारी याचा मृत्यु झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे (Uttam Bhajnavale PI) तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed