Sinhagad Road Pune Crime News | पुणे : व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणावर काळाबाजार ! टेम्पो, 72 गॅस सिलेंडरसह 10 लाखांचा माल जप्त
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | एकावेळी भारत गॅस व एच पी कंपनीच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर टाक्या एकत्र घेऊन त्यांचा काळा बाजारात विकण्याचा प्रयत्न करणाया कर्मचार्याला सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police) पकडले. त्याच्याकडून ७२ गॅस टाक्यांसह टेम्पो असा १० लाख २८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे. (Black Marketing Of Commercial Gas Cylinders)
सोमनाथ लहु भोजने Somnath Lahu Bhojane (वय ३१, रा. वडगाव बुद्रुक) असे या कर्मचार्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर व त्यांचे सहकारी कार्यालयात उपस्थित असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वडगाव भाजी मंडई येथील रोडवर एक जण व्यावसायिक गॅस सिलेंडरची अवैद्यरित्या विक्री करीत आहे. बातमीची खातरजमा करुन पोलीस घटनास्थळी पोहचले. तेव्हा गोयल गंगाकडे जाणार्या रोडच्या कडेला एक जण निळ्या पिवळ्या रंगाच्या गॅसच्या टाक्यांचा साठा करुन विक्री करताना दिसून आला. पोलिसांनी सोमनाथ भोजने याच्याकडे चौकशी केली. तेव्हा या भरलेल्या टाक्या त्याचा मालक विकास धोंडाप्पा आकळे (रा. वडगाव बुद्रुक) यांनी विक्री करण्यासाठी दिल्या होत्या, असे सांगितले. टेम्पोमध्ये एच पी गॅस व भारत गॅस कंपनीच्या ७२ व्यावसायिक गॅस सिलेंडर होते. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तूचा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुकत संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, आण्णा केकाण, उत्तम तारु, पंकज देशमुख, देवा चव्हाण, अमोल पाटील, विकास पांडोळे, शिवाजी क्षीरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते, विकास बांदल यांनी केली आहे. (Sinhagad Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत
Kolhapur Crime News | कोल्हापूर: स्पर्धा परीक्षेतील अपयशाच्या नैराश्यातून युवकाने संपवलं जीवन