Sinhagad Road Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड: गाडी वेगाने नेल्याच्या कारणावरुन कोयत्याने वार करुन तरुणाचा निर्घुण खून

Murder

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | केवळ गाडी वेगाने नेली, या कारणावरुन तिघा अल्पवयीन मुलांनी तरुणाचा कोयत्याने वार करुन खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षय मारुती किरवले (वय २०, रा. गणेशनगर, हिंगणे खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गणेशनगरमध्ये (Ganesh Nagar Pune)शुक्रवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली. सिंहगड रोड पोलिसांनी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. (Murder Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हा एका स्वीट मार्टमध्ये काम करत होता. ही अल्पवयीन मुले व अक्षय एकाच वस्तीत राहतात. वेगाने गाडी नेल्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा अक्षय याच्या घरासमोर तिघांनी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या अक्षय याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत. (Sinhagad Road Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed