Sinhagad Road Pune Crime News | धक्कादायक ! पु. ल. देशपांडे गार्डनमधील शौचालयात महिलांचे फोटो काढण्याचा प्रकार; फोटो काढणार्यावर गुन्हा दाखल
पुणे : Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये (Pu La Deshpande Garden) फिरायला आलेल्या महिलांचे शौचालयात मोबाईलवर फोटो काढला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी (Parvati Police Station) एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका ५० वर्षाच्या महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विकास चंद्रकांत पवार Vikas Chandrakant Pawar (रा. जनता वसाहत, सिंहगड रोड – Sinhagad Road Pune) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या शेजारी राहणार्या एका ६० वर्षाच्या महिलेसह पु. ल. देशपांडे गार्डनमध्ये फिरायला येत असतात. नेहमीप्रमाणे शनिवारी सायंकाळी त्यात गार्डनमध्ये फिरायला गेल्या होत्या. वॉशरुमसाठी त्या गार्डनमधील शौचालयात गेल्या. त्यावेळी विकास पवार याने शौचालयाचे खिडकीतून डोकावून त्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढले. पवार हा फिर्यादीच्या ओळखीचा असून तो फोटो काढतो,
हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यानंतर तो पळून गेला. पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य