Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
पुणे : Sinhagad Road Pune Flood | जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे शहरात पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि संसार रस्त्यावर आले. असेच एक दाम्पत्य पत्नी स्वयंपाकाची कामे करते तर पती चित्रपट किंवा इतर माध्यमातून मिळतील तशा छोट्या भूमिका करतात.
दोघांच्या उत्पन्नातून त्यांचे अर्थार्जन होते. त्यात पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने नवे संकट उभे राहिले असल्याची भावना ६७ वर्षीय विद्या गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. विठ्ठलवाडीतील बैठ्या दोन खोलांच्या घरात विद्या गोसावी आणि त्यांचे पती मुकुंद गोसावी (वय ७५) हे ज्येष्ठ दांपत्य राहते. दुर्दैवाने त्यांच्या दोन्हीही मुलांचे अकाली निधन झाले.
रविवारी नदीपात्रात पाणी सोडले होते. मात्र त्यांच्या घरात विठ्ठलवाडीतून वाहत असलेल्या ओढ्यामुळे पाणी शिरले. ओढ्यावरील अतिक्रमणे, त्यातून पाण्याचा निचरा कमी होणे, परिणामी सांडपाणी वाहिन्यांवर ताण येणे या सगळ्यातून फुगवटा निर्माण होऊन नागरिकांच्या घरात पाणी शिरते. तेच पाणी गोसावी यांच्या घरात शिरले.
विद्या गोसावी या सकाळीच घराबाहेर पडल्या होत्या. स्वयंपाकाची कामे करून त्या दुपारी दोन वाजता घरी परतल्या. तेव्हा त्यांच्या घरात गुडघाभर पाणी होते. घराचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो उघडू शकला नाही. अथक प्रयत्नांनी त्यांनी दरवाजा उघडला.
मात्र पुराच्या पाण्यात घरातील पलंग, कपडे धुण्याचे मशीन आणि इतर साहित्य बुडाले होते.
ती रात्र त्या दोघांनी शेजारीच असलेल्या एका कंपनीच्या कार्यालयात काढली.
योग्य नियोजन नसल्यामुळे या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले.
नदीपात्रात पाण्याचा फुगवटा निर्माण होऊ नये,
म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | ठाकरे-फडणवीस वादात अजित पवारांची उडी; म्हणाले – ‘आता एकमेकांचे कपडे काढायचं बाकी…’