Snehal Barge Passes Away | पुणे: कर्तव्यनिष्ठ अधिकारी काळाच्या पडद्याआड; अपर जिल्हाधिकारी स्नेहल बर्गे यांचे निधन

Snehal Barge

पुणे : Snehal Barge Passes Away | कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ख्याती मिळविलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे (वय-४८) यांचे आज सोमवार (दि.२४) पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्या सध्या पीएमआरडीएमध्ये जमीन व मालमत्ता विभागात सहआयुक्त म्हणून कार्यरत होत्या. १९९९ मध्ये म्हणजेच वयाच्या २२ व्या वर्षी उपजिल्हाधिकारी संवर्गात पुणे येथे महसूल विभागात त्यांची निवड झाली होती.

पुणे येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, वाळवा तसेच हवेली येथील प्रांताधिकारी, महसुल विभागात उपजिल्हाधिकारी, विशेष भूसंपादन अधिकारी म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. अपर जिल्हाधिकारी म्हणून त्या पदोन्नतीने पीएमआरडीएमध्ये नियुक्त झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.

You may have missed