Social Welfare Department Pune | मिनी ट्रॅक्टरकरीता अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
पुणे : Social Welfare Department Pune | अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येत असून याचा लाभ घेण्याकरीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपये इतकी कमाल मर्यादा (९० टक्के शासकीय अनुदान व १० टक्के स्वयंसहाय्यता बचत गटांचा हिस्सा) असून याअंतर्गत किमान ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य करण्यात येते. लाभार्थ्याने कमाल मर्यादा रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किंमतीच्या ९० टक्के शासकीय अनुदान अदा करण्यात येणार आहे. (Social Welfare Department Pune)
अर्ज करण्याकरीता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत. तसेच ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचत गटाचे अध्यक्ष व सचिवही अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत.
अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, सामाजिक न्याय भवन,
सर्वे क्र. १०४/१०५, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या समोर, येरवडा, पुणे-०६ (दूरध्वनी-०२०-२९७०६६११) येथे संपर्क साधावा,
असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sindhudurg Crime News | पोलीस दलात अधिकारी असल्याचे भासवत नोकरीचे आमिष दाखवत फसवणूक
Lonavala Rains | लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद ! गेल्या 24 तासांत तब्बल 275 मिलीमीटर पावसाची नोंद