Solapur Accident News | टॅक्टर पलटी होऊन 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Solapur Accident

सोलापूर : Solapur Accident News | टॅक्टर पलटी होऊन शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. स्वराज मनोज देशमुख (वय-१३) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना मोहोळ तालुक्यातील घाटणे गावच्या शिवारात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे मनोज हणमंत देशमुख हे त्याच्या कुटुंब समवेत राहून शेती करतात. त्यांचा मुलगा स्वराज हा ७ वी मध्ये शिकत आहे. दि.५ सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास मनोज देशमुख यांनी त्यांच्या घराचे समोर त्यांचा ट्रॅक्टर क्र.एम.एच.१३/डी.टी.०२४३ हा उभा करून जेवण करीत होते. त्यावेळी मुलगा स्वराज याने ट्रॅक्टर चालु करून शेताकडे नेत होता. टॅक्टर वेगात असल्याने गावाच्या लगत असलेल्या पाणी पुरवठा विहीरीच्या शेजारी रोडलगत चारी असलेल्या खड्ड्यात पलटी झाला.

त्यात स्वराज देशमुख हा ट्रॅक्टरसह पाण्यात पडल्याने गंभीर जखमी झाला. त्यावेळी त्याच्या नातेवाईकांनी व गावातील लोकांनी स्वराजला तात्काळ बाहेर काढून मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचारापूर्वीच स्वराजचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून याबाबतची फिर्याद विश्वास जालींदर गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत. (Solapur Accident News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Weather News | येत्या दोन दिवसात राज्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Pune RTO | खासगी अथवा सरकारी नोकरी करणाऱ्यांकडे रिक्षा परमीट असेल तर परत करा, आरटीओ कडून होणार कारवाई

Santosh Deshmukh Murder Case | सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील फरार सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना अटक;
बीडच्या विशेष तपास पथकाला यश, पुण्यातून घेतले ताब्यात