Solapur Crime | दारुच्या नशेत पत्नीला संपवले, बापाचा मोडला हात अन् स्वत: घेतला गळफास; बार्शी तालुक्यात खळबळ

New-Project-19

सोलापूर :– Solapur Crime | पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील शेलगाव येथील या एका हृदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. वसंत पवार आणि आयनाबाई उर्फ सोनाबाई वसंत पवार असे मृत पावलेल्या दांपत्याचे नाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, वसंत पवार यांना दारूचे व्यसन होते. याच कारणामुळे त्यांचे पत्नीसोबत नेहमी वाद होत होता. मात्र, मंगळवारी रात्री दारु पिऊन आलेल्या पतीने रागाच्या भरात असे काही केले की, संपूर्ण कुटूंब उद्धवस्त झाले. मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंत पवार यांनी पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दंडुक्याने मारहाण केली होती. मात्र, रागाच्या भरात पत्नीला एवढ्या जोरात मारहाण केली की, पत्नीचा जागीच मृत्यू झाला. सोनाबाईला डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्यामुळे जागीच गतप्राण झाल्या. तर वडील अंबादास यांना मारहाणीमुळे त्यांचा हात फॅक्चर झाला. मृत पडलेली पत्नी आणि वेदनेने विवळत असलेले वडील पाहून वसंत पवार यांना धक्का बसला आणि त्यांनी पळ काढला.

दरम्यान, आता आपलं काही खरं नाही, याचा अंदाज येताच वसंत पवार यांनी विरहातून सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वैराग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

You may have missed