Solapur Crime News | भांडणाच्या रागातून पतीच्या डोक्यात दंडुक्याने मारहाण करून खून; पत्नीला अटक

सोलापूर : Solapur Crime News | भांडण सुरु असताना रागाच्या भरात पत्नीने पतीला दंडुक्याने मारहाण केल्याने पतीच्या डोक्याला मार लागल्याने तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. त्यानंतर उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाल्याची घटना तांदुळवाडी येथून समोर आली आहे. संशयित आरोपी पत्नीविरुद्ध सोलापूर तालुका पोलिसात (Solapur Taluka Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
धुळप्पा नंदकुमार हेले Dhulappa Nandkumar Hale (वय ३५) असे मृत्यू झालेल्याचे तर प्रगती धुळप्पा हेले Pragati Dhulappa Hele (वय ३२, रा. तांदूळवाडी) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी धुळप्पा याची आई सोनाबाई नंदकुमार हेले (वय ५५, रा. तांदूळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. सोनाबाई या नातेवाईकांचे लग्न असल्याने कुंभारीला गेल्या होत्या. घरात सकाळपासूनच मुलगा धुळप्पा व सून प्रगती यांच्यात भांडण सुरू होते.
भांडणात धुळप्पा याने प्रगतीला मारहाण केली. त्यात तीही जखमी झाली. भांडण विकोपाला गेल्याने तिने दंडुक्याने डोक्यावर मारल्याने तो रक्तबंबाळ झाल्याने बेशुद्ध पडला. प्रगती हिने स्वतः कॉल करून दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्यानंतर दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारावेळी धुळप्पा याचा मृत्यू झाला.
त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत घटनास्थळाचा पंचनामा करून प्रगतीला रुग्णालयातून ताब्यात घेतले.
धुळप्पा आणि प्रगतीचा १५ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.
त्यांना सात वर्षाची इशू आणि १२ वर्षाची प्राची अशा दोन मुली आहेत. (Solapur Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा