Solapur Crime News | सोलापुरातील मुलतानी बेकरी मालकाचा धक्कादायक निर्णय; 17व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
सोलापूर : Solapur Crime News | येथील शहरातील प्रसिद्ध मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी (वय ५९) यांनी गुरुवारी दुपारी विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटच्या १७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शहरात खळबळ निर्माण झाली आहे.
सुनील सदारंगानी यांनी अपार्टमेंटच्या आवारात गाडी थांबवली आणि थेट वरच्या मजल्याकडे गेले. काही वेळाने त्यांनी बालेकिल्यावर हात जोडून प्रार्थना करत उभे असल्याचे लोकांनी पाहिले. अचानक त्यांनी खाली उडी मारली आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सदारंगानी काही काळापासून आर्थिक अडचणीत होते आणि मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. त्यांना दोन मुले असून, एक अमेरिकेत तर दुसरा पुण्यात व्यवसाय करतो.
