Solapur Crime News | तंबाखू खाण्यावरून झालेल्या वादात तरुणाचा मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Solapur Crime News | सोलापुरात मावा खाऊ घालण्यावरून दोघा तरुणांमध्ये झालेल्या वादात एकाचा मृत्यू झाला आहे. धाकटी ईरण्णा वस्ती परिसरात रात्री घडलेल्या एका घटनेत तिमण्णा सिद्राम बंडे (वय ३३, रा. मधुकर उपलब वस्ती, सोलापूर) याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत त्याची आई लक्ष्मीबाई सिद्राम बंडे (वय ६५) यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
समोर आलेल्या माहितीनुसार, दिलेल्या फिर्यादीनुसार एका २५ वर्षांच्या तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा करण्यात आला आहे. मृत तिमण्णा बंडे हा रात्री कामावरून घरी परतला, त्यानंतर तो गल्लीत गेला. थोड्याच वेळात त्याच्या मित्राने त्यास तंबाखूजन्य असलेला मावा खाऊ घालण्याचा आग्रह धरला. पण, तिमण्णा याने पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा चिडून मित्राने तिमण्णा याच्या कानशिलात मारली आणि त्याला ढकलून दिले. यामध्ये तिमण्णा हा डोक्यावरून जमिनीवर पडला. त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संबंधित तरुण पसार झाला. याप्रकरणी पोलिस तपास करीत आहेत.