SP / DCP Transfer Maharashtra | पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली ! विक्रांत देशमुख यांची महामार्ग सुरक्षा पथकाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती, गडचिरोली एसआरपीएफचे विवेक मासाळ पुण्यात DCP
पुणे : SP / DCP Transfer Maharashtra | राज्य शासनाने राज्य पोलीस दलातील १६ पोलीस अधीक्षक/ पोलीस उपायुक्त यांची बदली केली आहे. अवर सचिव संदीप ढाकणे यांनी हे आदेश काढले आहेत.
पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांची छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh) यांची महामार्ग सुरक्षा पथक, पुणे येथे पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
राज्य राखीव पोलीस दलाचे गट क्रमांक १३ गडचिरोलीचे समादेशक विवेक मासाळ (DCP Vivek Masal) यांची पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (SP / DCP Transfer Maharashtra)
अन्य पोलीस अधिकार्यांचे सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण
संदीप पालवे (पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड)
संदीप भाजीभाकरे ( पोलीस उपायुक्त, लोहमार्ग, मुंबई ते उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर)
विवेक मासाळ (समादेशक, रा. रा. पोलीस बल, गट क्रं. १३ गडचिरोली ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर)
सचिन गुंजाळ (पोलीस उपायुक्त, ठाणे शहर ते पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर)
रोहिदास पवार (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस उपायुक्त छत्रपती संभाजीनगर)
दत्ताराम राठोड ( पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, अमरावती ते अपर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर)
विवेक पानसरे (पोलीस उपायुक्त, नवी मुंबई ते पोलीस उपायुक्त बृहन्मुंबई)
रश्मी नांदेडकर (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर ते पोलीस उपायुक्त नवी मुंबई)
प्रदीप चव्हाण (मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई ते पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई)
मीना मकवाणा (उपायुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस उपायुक्त, ठाणे शहर)
दत्ता नलावडे (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते पोलीस उपायुक्त, लोहमार्ग, मुंबई)
राजू भुजबळ (पोलीस उपायुक्त, बृहन्मुंबई ते मुख्य सुरक्षा अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई)
रुपाली दरेकर (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर)
अनिता जमादार ( पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पक्षक, छत्रपती संभाजीनगर ते पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर)
लता फड (पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे ते उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर)
विक्रांत देशमुख (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, पुणे)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून