SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
पुणे : SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात थोर स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच महाराष्ट्राचे दिवंगत ज्येष्ठ नेते आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या सरस्वती सभागृहात विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव तथा वित्त व लेखा अधिकारी सीएमए डॉ. चारुशिला गायके, अधिष्ठाता प्रा.(डॉ.) विजय खरे यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी अधिसभा सदस्य सुमित ढोरे, सहायक कुलसचिव डॉ. अजय ठुबे, शिवाजी उतेकर, शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे विभागप्रमुख, भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब आंत्रे, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थी यांच्यासह भारतीय कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
