SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजीच्या पदवी अभ्यासक्रमाला सुरूवात

SPPU News

पुणे : SPPU News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजीच्या पदवी अभ्यासक्रमाला २२ जुलै २०२४ पासून सुरूवात झाली. बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नोलॅाजी हा पदवी अभ्यासक्रम सुरू करणारे सावित्रीबाई फुले विद्यापीठ हे देशातील पहिले राज्यस्तरीय विद्यापीठ आहे. या अभ्यासक्रमाचे हे पहिलेच वर्ष आहे. या अभ्यासक्रमाला विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रवेश मर्यादा पूर्ण भरली आहे.

सदर अभ्यासक्रमाची सुरूवात म्हणून विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात ब्लॅाकचेन क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या आयोजित कार्यक्रमात बोलताना तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॅा. आदित्य अभ्यंकर यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी असण्याचे खरे लक्षण म्हणजे ‘जिज्ञासूपणा’असतो. कोणताही प्रश्न हा दुर्लक्षित करणारा नसतो. विद्यार्थ्यांनी शिकताना जास्तीत जास्त प्रश्न विचारून संकल्पना स्पष्ट करून घ्याव्यात. ब्लॅाकचेन तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. सध्याचे युग हे डेटा युग आहे. ब्लॅाकचेन तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थांनी स्वतःच्या विकासासोबतच समाज आणि देशासाठी डेटा सुरक्षा पोहचवण्यात योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना दिले. सदर कार्यक्रमात ‘झो’ या ब्लॅाकचेन प्लॅटफॅार्मचे प्रतिनिधी फारूक चिस्टी यांनी विद्यार्थांना वेब ३ प्लॅटफॅार्मची तसेच डिजिटल करन्सीची ओळख करून दिली. ब्लॅाकचेन क्षेत्रात असणाऱ्या रोजगाराच्या संधींची ओळख करून देऊन आणि त्या संधीपर्यंत पोहचण्यासाठीच्या नेटवर्कींमध्ये विद्यार्थांना जोडण्यात आले.

जगभरातील डेटा सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॅाकचेन तंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. फक्त देशातच नाही तर जगभरात खाजगी आणि सरकारी अशा सर्वच क्षेत्रात ब्लॅाकचेन डेव्हलपर आणि ब्लॅाकचेन आर्कीटेक्चर्सची मागणी वाढत आहे. ही गरज ओळखूनच बी.एस्सी ब्लॅाकचेन टेक्नॅालॅाजीच्या पदवी अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला होता. या पदवी अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॅा) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॅा) पराग काळकर आणि प्रभारी कुलसचिव प्रा.(डॅा) विजय खरे यांनी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण, रोजगाराभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सातत्याने प्रयत्न असतो. ब्लॅाकचेन तंत्रज्ञान डेटा सुरक्षेमध्ये महत्वपूर्ण असल्याने या तंत्रज्ञानाची गरज दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. या तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने विचार करावा.
प्रा.(डॅा) सुरेश गोसावी
कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

विद्यार्थी आणि पालक करिअरच्या बाबतीत जागरूक होत आहेत. भविष्यातील संधी ओळखून या अभ्यासक्रमाला मिळालेला प्रतिसाद उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अशा इंडस्ट्री ओरिएंटेड कोर्सेसचा समावेश करण्यावर भर देत आहे.
प्रा.(डॅा) पराग काळकर
प्र कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

आयटी क्षेत्रामध्ये सतत नविन तंत्रज्ञानांचा समावेश होत आहे. इंडस्ट्री ४.० मध्ये समावेश असलेल्या तंत्रज्ञानांची क्षमता ओळखून विद्यार्थ्यांनी स्वतःला अपग्रेड करत रहावे.
डॅा. विजय खरे
प्रभारी कुलसचिव , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC On Unauthorized Construction | कंपाउंडींग फी आकारून अनधिकृत बांधकाम नियमान्वीत करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिकेची सर्वोच्च न्यायालयात धाव

Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी

Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता

Chandrakant Patil-Pune Flood | उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्याकडून पूर परिस्थितीची पाहणी

Murlidhar Mohol – Pune Flood | केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा