Squadron Leader Dies Of Dengue | पुणे: हवाई दलाच्या जवानाचा डेंगीने घेतला बळी
पुरंदर : Squadron Leader Dies Of Dengue | भारतीय हवाई दलामध्ये स्क्वाड्रन लीडर या वरिष्ठपदावर नागालँड येथे कार्यरत असणारे विजयकुमार ज्ञानेश्वर झेंडे Vijayakumar Dnyaneshwar Zende (वय ३६) यांचे डेंगीच्या आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दिवे या त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले.
यावेळी भारतीय हवाई दलातील, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, सैनिक उपस्थित होते. त्यांच्याकडून विजयकुमार यांना मानवंदना देत तीन फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, पुरंदरच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम राजपूत, सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे, राहुल शेवाळे, दिलीप वाल्हेकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे सभासद यांनी पुष्पचक्र व पुष्प वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
विजयकुमार यांनी आपली देशसेवा बजावत असताना भारत-रशिया युद्ध सरावात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. कोरोना काळात इंडोनेशिया येथून ऑक्सिजन आणण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. विजयकुमार हे सुट्टीवर आले असताना त्यांना डेंगीची लागण झाली. यामध्येच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी ,भाऊ, बहीण, चुलते असा परिवार आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर झेंडे हे पोलीस खात्यातून उपविभागीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…