Sri Uvasaggaharam Stotra | ‘श्री उवसग्गहरं स्तोत्र” च्या सामूहिक पठणाचे रविवारी (25 ऑगस्ट रोजी) भव्य आयोजन’

RMD Foundation

पुणे : Sri Uvasaggaharam Stotra | जैन धर्मियांमध्ये महामंगलकारी समजल्या जाणाऱ्या श्री. उवसग्गहरं स्तोत्राच्या सामुहिक पठणाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. यावर्षी स्तोत्र पठणाचे आठवे वर्ष असून प्रथम कार्यक्रम २०१७ मध्ये दानशूर आदरणीय श्री. रसिकलालजी धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संत व साध्वी म. सा. यांच्या सानिध्यात संपन्न झाला होता.

“श्री उवसग्गहरं स्तोत्राच्या नियमित स्मरणामुळे दृष्टग्रह, रोगपिडा, शत्रु आदि सांसारिक दुःखपिडा दुर होतात व मनुष्य प्राणीमात्रामधे सुख समृद्धी प्राप्त होते अशी धारणा आहे.

आर.एम.धारिवाल फाउंडेशनच्या (RMD Foundation) अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन (Janhavi Dhariwal Balan) व उपाध्यक्षा शोभा रसिकलालजी धारीवाल (Shobha Rasiklalji Dhariwal) यांच्याद्वारे दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत आचार्य पद्मश्री चंदनाजी म. सा. आणि पू. श्री सुप्रियदर्शनजीं म. सा. आदीठाणा – ५ यांच्या उपस्थितीत ” उवसग्गहरं स्तोत्र ‘सामूहिक पठणाचे आयोजन श्रीमान रसिकलालजी एम धारीवाल स्थानक भवन यश लॉन्स, बिबवेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आलेले आहे.

कार्यक्रम वेळेवर ठीक ४ वाजता सुरु होईल. दिलेल्या नियोजित वेळेत लहान-थोर, जैन-अजैन या सर्वांनी सहपरिवार या महामंगलकारी स्तोत्रात सहभागी होऊन लाभ घ्यावा. सहभागी होणाऱ्या पुरुषांनी शुभ्र तर महिलांनी केशरी वस्त्र परिधान करणे अनिवार्य आहे अशी माहिती फाऊंडेशनच्या शोभा रसिकलालजी धारिवाल यांनी दिली आहे. (Sri Uvasaggaharam Stotra)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | दुकानदारास मारहाण करुन लुटणार्‍या गुंडांना अटक; दगडफेक करुन दोन कारच्या काचा फोडल्या

RBI On Two Thousand Rupee Notes | खुशखबर ! दोन हजारांच्या नोटा पोस्टामार्फत आरबीआयकडे (RBI) जमा करण्याची सुविधा

Hinjewadi Pune Crime News | 14 वर्षाच्या मुलीवर तीन महिने वारंवार बलात्कार; टेम्पोचालकाला अटक, वाल्हेकर वाडीमधील घटना

Kalyani Nagar Porsche Car Accident Pune | रक्त बदलणारा अरुणकुमार याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरण

Sinhagad Road Pune Crime News | पुण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून ! बारमध्ये झालेल्या वादातून बाऊन्सरने हातोडा मारुन घेतला जीव

You may have missed