ST But Ticket Fare Hike | नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, एसटीचा प्रवास महागणार

ST But

मुंबई : ST But Ticket Fare Hike | महायुती सरकारला (Mahayuti Govt) जनतेने स्पष्ट बहुमत दिले आहे. ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिली आहेत. दरम्यान ही आश्वासने पूर्ण होणार का? हे येणारी वेळच ठरवणार आहे.

मात्र आता नव्या सरकारच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाने तब्बल १८ टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. सातत्याने होत असलेल्या महागाईमुळे एसटी महामंडळाने १८ टक्के भाडेवाढीचा हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. निवडणुकीपुर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.

याआधी २०२१ मध्ये शेवटची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. राज्यसरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई-पुणे प्रवास तब्बल ५० ते ६० रुपये महाग होण्याची शक्यता आहे. (ST But Ticket Fare Hike)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed