State Excise Department Pune | पुणे : सौंदर्य प्रसाधनांच्या आडून मद्याची तस्तरी, मद्यासह दीड कोटीचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन विभागाची खेड-शिवापूर येथे कारवाई

State Excise Department Pune

पुणे : State Excise Department Pune | सौंदर्य प्रसाधनाच्या नावाखाली गोवा राज्यात विक्रीकरीता असलेल्या मद्याच्या वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग सासवड (Saswad) यांनी कारवाई केली आहे. या कारवाईत मद्यासह दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.10) सातारा-पुणे हायवेवरील खेड-शिवापूर गावच्या (Khed-Shivapur) हद्दीतील हॉटेल जगदंब समोर करण्यात आली.

राज्य उत्पादन विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपुत (Charan Singh Rajput) यांना सातारा-पुणे महामार्गावरुन (Pune-Satara Highway) गोवा राज्यात विक्रीकरता असलेल्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सासवड विभागाच्या पथकाने मोहिम राबवुन वाहनांची तपासणी केली. बुधवारी खेड शिवापूर गावच्या हद्दीतील हॉटेल जगदंब समोर एक 14 चाकी संशयित भारत बेंज कंपनीचा ट्रक (एचआर 63 डी 8878) थांबवला. चालकाकडे ट्रकमधील सामानाबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले.

पथकाला संशय आल्याने ट्रकची तपासणी केली असता, वाहनामध्ये गोवा राज्यात निर्मित व विक्रीस असलेल्या रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 79 हजार 680 सिलबंद बाटल्या(1660 बॉक्स), 750 मिली क्षमतेच्या 6480 सिलबंद बाटल्या (540 बॉक्स) मिळाले. या कारवाईत पथकाने ट्रक व मद्य असा 1 कोटी 51 लाख 6 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक सुनिल चक्रवर्ती याला अटक केली आहे. आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क, मुंबई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे यांच्या आदेशाने पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर, अधीक्षक चरणसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप मोहिते, राम सुपेकर, रोहित माने, धवल गोलेकर,
सहायक दुय्यम निरीक्षक सागर दुर्वे, संदीप मांडवेकर, जवान भागवत राठोड, तात्या शिंदे, समीर पडवळ,
अक्षय म्हेत्रे, रणजित चव्हाण, राम चावरे, सुनील कुदळे, दत्तात्रय पिलावरे, अंकुश कांबळे यांच्या पथकाने केली.
पुढील तपास दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाचे प्रदीप मोहिते करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed