Stock Market News | शेअर बाजाराची घोडदौड सुरूच; गुंतवणूकदार मालामाल

मुंबई : Stock Market News | निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सलग सातव्या सत्रात देखील भरारी पाहायला मिळत आहे. मंगळवारी (25 मार्च) सकाळी शेअर बाजार सुरू झाल्यानंतर सकारात्मक तेजी पाहायला मिळत आहे.
मंगळवारी सकाळी 10 वाजता सेन्सेक्समध्ये 620 अंकाची उसळी झाल्याचे दिसून आले. तर निफ्टीनेही 190 अंकाने वधारून 2,800 चा टप्पा पार केला आहे. आज बाजारात काही स्टॉक वगळता अनेक स्टॉकमध्ये हिरवा रंग दिसून आला आहे.
मागील काही आठवड्यांत बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली होती. त्यानंतर मागच्या आठवड्यात 3077 अंकानी वधारल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला देखील बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळते. सोमवारी सेन्सेक्सने 1,200 अंकाची उसळी घेतली होती. त्यानंतर आज (मंगळवार) सेन्सेक्सने 78,600 टप्पा ओलंडला आहे. तर निफ्टी निर्देशांक 23,832 वर पोहचला आहे.