Suhas Diwase On Puja Khedkar | पूजा खेडकरला खोलीत बोलविले? आरोपांवर पुणे जिल्ह्याधिकारी म्हणाले – “तिच्याशी तीनवेळा भेट झाली पण…”

IAS Puja Khedkar-Collector Dr Suhas Diwase

पुणे: Suhas Diwase On Puja Khedkar | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर असाधारण मागण्यांमुळे चर्चेत आहे. खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या. या मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी वाशिम येथे पुणे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळ केल्याची तक्रार केली होती. (Suhas Diwase On Puja Khedkar)

UPSC ने गुन्हा दाखल केल्यानंतर आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनसाठी (Pre-Arrest Bail) अर्ज केला. यामध्ये खेडकरने अटकेला विरोध केला आहे. सुहास दिवसे यांनी पूजाला त्यांच्या खोलीत यायला सांगितल होते. मात्र, पूजाने त्याला नकार दिला, असा दावा ही खेडकरच्या वकील ॲडव्होकेट विना माधवन (Adv Veena Madhavan ) यांनी कोर्टात केला. त्यानंतर आता पुणे जिल्हाधिकारी (Pune Collector Suhas Diwase) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकरांचे हे आरोप खोडून काढले आहेत. दिवसे यांनी सांगितले की, पूजा हीने केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. सर्व आरोप रचलेले आहेत. खेडकर या ३ ते १४ जून पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित होत्या. यावेळी पूजा खेडकर यांना मोजून तीन वेळा भेटलो. या सर्व भेटी प्रशासकीय होत्या. यावेळी अन्य अधिकारी आणि वकील देखील उपस्थित होते असे दिवसे यांनी सांगितले.

या काळात कधीही मी पूजा यांना एकटा असताना भेटलो नाही किंवा त्यांच्याशी एकटा असताना चर्चा केली नाही. १४ जूननंतर त्यांना विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात जाण्यास सांगण्यात आले, तिथे पोस्टिंग होताना पूजाने कोणताही आरोप केला नाही.

राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात, माझ्या पत्राच्या उत्तरात तिने असा कोणताही आरोप केलेला नाही. जेव्हा तिला वाशिमला पाठविण्यात आले तेव्हा तिने जाणूनबुजून अशा प्रकारचे आरोप केले आहेत. तिने असे का केले हे सर्वांना माहिती आहे,असेही दिवसे यांनी स्पष्ट केले.

पूजा खेडकर हिच्या चमकोगिरी वरून आवाज उठल्यावर तिची बदली वाशिमला करण्यात आली होती.
तिथे बनावट प्रमाणपत्रे, नाव बदलून युपीएससी परीक्षा देणे,
वडिलांची अवैध संपत्ती आदी गोष्टी विरोधात जात असल्याचे पाहून दिवसे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार
दिली होती.

युपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे.
यामुळे ती वाशिममधून बेपत्ता झाली आहे. तिचे वकील दिल्लीतील न्यायालयात तिला अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | मनसे पुण्यातील सर्व जागा लढण्याच्या तयारीत; राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune Police News | घरातून रागाच्या भरात निघून गेलेला अल्पवयीन मुलगा सापडला जबलपूरला !
रेल्वे स्टेशनला विकत होता पाण्याच्या बाटल्या, पोलीस आयुक्तांकडून 5 लाखांचे बक्षीस जाहीर

Pune Police Inspector Transfers | पुणे शहरातील 20 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; जाणून घ्या कोणाची कोठे झाली बदली

Eknath Shinde On Uddhav Thackeray | “मराठा आरक्षणाचा चेंडू मोदींच्या कोर्टात टाकून…”
एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, म्हणाले, “दोन समाजामध्ये भांडणे …”

UBS Securities Issue Public Notice | शेयर बाजारात फसवणूक करणार्‍यांपासून सावधान!
ब्रोकरेज फर्मकडून बहुरूप्यांची पोलखोल, पैसे लावण्यापूर्वी करा 100 वेळा विचार

You may have missed