Suicide News | ‘आई-बाबा रडू नका, माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही’, पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या; खिशात सापडली 5 पानांची सुसाईड नोट

उत्तरप्रदेश : Suicide News | पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून २३ वर्षीय तरुणाने रहात्या घरी पंख्याच्या हुकला स्वतःला लटकवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या खिशातून पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील इटावाच्या चौबिया पोलीस स्टेशन परिसरातील उन्वा संतोषपूर गावात घडली.
अधिक माहितीनुसार, अमितचे लग्न दीड वर्षांपूर्वी रिंकी नावाच्या मुलीशी झाले होते आणि दोघांनाही चार महिन्यांचा मुलगा आहे. तथापि, लग्नापासून पती-पत्नीमधील संबंध ताणले गेले होते आणि दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. काही दिवसांपूर्वी अमितची पत्नी तिच्या आईवडिलांच्या घरी रहायला गेली होती.
घटनेच्या दिवशी अमितचे वडील एका निमंत्रणासाठी बाहेर गेले होते आणि त्याची आई त्यावेळी घराबाहेर काम करत होती. अमित बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याला आवाज दिला. परंतु अमितचा काहीही प्रतिसाद न आल्याने त्याची आई वरच्या मजल्यावर गेली असता अमितने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरम्यान पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हंटलं ?
“माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी, सासू, मेहुणी आणि मेहुणे जबाबदार आहेत. सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत, पासवर्ड ७८९६ आहे. आई आणि बाबा, रडू नका, माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.”