Sujay Vikhe Patil | माजी खासदार सुजय विखेंचे भरसभेत वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…’

अहिल्यानगर: Sujay Vikhe Patil | गेल्या दोन दिवसांपासून थोरात-विखे या दोन्ही कुटुंबातील वाद शिगेला पोहोचला असून समर्थकही एकमेकांविरोधात भिडले आहेत. माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी काल (दि.२७) संगमनेर तालुक्यात जहाल भाषण केलं. टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात सुजय विखेंचं भाषण गाजलं. त्यातच, त्यांनी आचारसंहिता मोडत असल्याचे भाष्य केले आहे. (Sangamner Assembly Election 2024)
सुजय विखे म्हणाले, “तुम्ही आमच्यावर आरोप करता. आमची सहनशीलता आमची कमजोरी समजू नका. आज या तारखेपासून मी आचारसंहिता मोडत आहे. जर उद्या कोणीही पातळी सोडून राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात बोललं तर याद राखा टायगर अभी जिंदा है. तिथेच गाडेन”, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले,” तुम्हाला भाषण करायचं आहे. ज्या लोकांची ग्रामपंचायतीत निवडून येण्याची लायकी नाही,
ते आमच्या कार्यकर्त्यांना कुत्रा म्हणतात. काय महाराष्ट्राला सांगता तुम्ही सुसंस्कृत आहात?
तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला, संगमनेरसाठी काय करणार आहात यावर बोला.
पण त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही”, असं सुजय विखे यांनी म्हंटल आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा