Sujay Vikhe Patil | माजी खासदार सुजय विखेंचा खळबळजनक दावा; म्हणाले – ‘मला जीवे मारण्याचा कट होता’

Sujay Vikhe Patil

संगमनेर : Sujay Vikhe Patil | भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील (Sangamner Assembly Constituency) धांदरफळ गावात युवा संकल्प मेळावा घेतला होता. या मेळाव्यात वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची कन्या जयश्री थोरात (Jayshree Thorat) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात आरॊप-प्रत्यारोप सुरु आहेत.

दरम्यान वसंतराव देशमुख (Vasant Thorat) यांनी केलेल्या वक्तव्यावरून जाब विचारला जात आहे. थोरात समर्थक आक्रमक असून तणावाची परिस्थिती असल्याची माहिती आहे. याबाबत आता सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. मला जीवे मारण्याचा कट होता असे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले, ” सभेत महिलांबाबत झालेलं वक्तव्य निषेधार्ह आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला आणि आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील जेष्ठ आणि थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते.

त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. अशा प्रकारच्या खालच्या पातळीची टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा, असंदेखील आम्ही पोलिसांना सांगितलं आहे.

ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आणि पुढच्या १५ मिनिटांत त्या गावच्या एक्झिट पॉइंटवर प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या. दगडांनी गाड्या फोडल्या गेल्या. महिलांना हात धरून बाहेर ओढलं गेलं. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आले.

मी सभेतून निघताना त्यांच्याच यंत्रणेतून मला एकाचा फोन आला. हे असं करणार आहेत तुम्ही या रस्त्याने येऊ नका दुसऱ्या रस्त्याने जा असं त्याने मला सांगितलं. मात्र मी जाण्याआधी ज्या गाड्या निघाल्या होत्या त्या यातून वाचू शकल्या नाहीत.”

ते पुढे म्हणाले, ” तसंच, ‘माझ्यावरचा हल्ला माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंगावर घेतला.
वक्तव्य करणाऱ्याला अटक करा माझं काही म्हणणं नाही.
मात्र सर्वसामान्य घरातील महिलांना रात्री गाडीतून बाहेर ओढून हल्ला करता.
हे संगमनेरचं खरं चित्र आज महाराष्ट्रासमोर आलं आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्र देऊन तक्रार करणार आहोत.

हल्ला होत असताना स्थानिक आमदाराचे भाऊ, स्वीय सहाय्यक, माजी जिल्हा परिषद सदस्य
यांचे सर्व व्हिडिओ उपलब्ध आहेत. अशा दहशतीच्या वातावरणात निवडणुका होऊ शकत नाही
आणि यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊन मार्गदर्शन घेणार आहोत.

परवा आमच्या मतदारसंघात येऊन माझ्याबद्दल हा मुलगा डोक्यावर पडलेला आहे.
याला अक्कल नाही हा मूर्ख आहे असं बोललं गेलं.
मात्र यापुढे शिर्डी मतदारसंघात येऊन राधाकृष्ण विखे यांच्याविरोधात कुणी आक्षेपार्ह बोललं
तर त्याला जशाच तसे उत्तर देऊ”, असा इशारा सुजय विखे पाटलांनी दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Police Raid On Gambling Den | पुणे: शुक्रवार पेठेतील मटका किंग नंदू नाईकच्या जुगार अड्ड्यावर
पोलिसांचा छापा ! 60 जणांना घेतले ताब्यात, 1 लाखांची रोकड, 47 मोबाईल जप्त

Pune Police Nakabandi News | पुणे: पांढर्‍या पोत्यांमधून आणले जात होते 138 कोटींचे सोन्याचे दागिने; नाकाबंदीत लागले हाताला (Video)

Pune Crime Branch News | रिक्षाचालकाला मारहाण करुन लुबाडणारा चोरटा जेरबंद ! मारहाणीत पायाच्या नडगीचे हाड, मनगटाचे हाड केले होते फॅक्चर

Three Cops Suspended In Pune | पुण्यातील 3 पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या कारण

You may have missed