Sunil Shelke News | ‘अजितदादांना तोंडघशी पाडलं अन्…’, सुनील शेळकेंचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘शरद पवारांच्या संमतीनेच आम्ही सरकारमध्ये…’

Sharad Pawar - Sunil Shelke

मुंबई: Sunil Shelke News | मावळ विधानसभा मतदारसंघात (Maval Assembly) मावळ पॅटर्न अपयशी ठरला. याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) उमेदवार सुनील शेळके लाखांहून अधिकचे मताधिक्य घेत विजयी झाले. दरम्यान आता सुनील शेळके यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे. “शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्रीय नेतृत्वापुढे अजित पवारांना एकदा नाही तर तीन वेळा तोंडघशी पाडलं”, असे म्हणत शेळकेंनी मोठ्या घडामोडीवर भाष्य केले आहे.

सुनील शेळके म्हणाले, ” शरद पवारांच्या संमतीनेच आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो होतो. ज्यावेळी बैठका सुरु होत्या. त्यावेळी मंत्रिपद देखील फायनल झाले होते. मात्र, त्यांनी अजित पवारांना तोंडघशी पाडलं. असं तीन वेळा केंद्रीय नेतृत्वापुढे तोंडघशी पाडलं, मग आम्ही अजित पवारांना सांगितलं तुम्ही निर्णय घ्या. आम्ही पाठिंबा देतो आणि त्यामुळे आम्ही सहभागी झालो. आता देखील साहेबांचा आम्हाला पाठिंबा होता. त्यामुळे तर प्रफुल पटेल, दिलीप वळसे-पाटील, भुजबळ सोबत आले”, असा गौप्यस्फोट शेळके यांनी केला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sahakar Nagar Pune Crime News | पुणे : अनैसर्गिक कृत्य करायला लावून धमकाविल्याने दहावीतील मुलाची आत्महत्या

Eknath Shinde To Shivsainik | मुख्यमंत्रीपदावरून साशंकता, एकनाथ शिंदेंचे शिवसैनिकांना भावनिक
आवाहन; म्हणाले – ‘माझ्यावरील प्रेमापोटी…’

Ulhas Dhole Patil | माजी महापौर उल्हास ढोले पाटील यांचे निधन

Pune Rural Police News | स्मशानभूमीमधील लाकडावरुन पोलिसांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा ! वालचदंनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

Sahakar Nagar Pune Accident News | पीएमपी बसच्या धडकेत रस्ता ओलांडणार्‍या महिलेचा मृत्यु; पुणे सातारा रोडवरील सहकारनगर येथील घटना

Kondhwa Pune Crime News | कोंढवा: नराधम पित्याने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार

Katraj Pune Crime News | कोर्टाने तडीपार केले असतानाही दरोड्याच्या तयारीत असलेली चुहा गँग जेरबंद ! पिस्टल, काडतुस, मॅफेड्रान, रोकड असा माल हस्तगत

You may have missed