Sunil Tatkare On Jayant Patil | सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा; म्हणाले – ‘अजित दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर…’

Sunil Tatkare - Jayant Patil

बारामती: Sunil Tatkare On Jayant Patil | शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (Sharad Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर मोठा आरोप केला आहे. सिंचन घोटाळ्यावरून (Irrigation Scam Maharashtra) फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना ब्लॅकमेल (Blackmail) केल्याचे त्यांनी म्हंटले. त्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी जयंत पाटलांना इशारा दिला आहे. (Sunil Tatkare On Jayant Patil)

बारामती येथे माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले,” २०१४ मध्ये आम्ही निकाल पूर्ण हाती येण्याअगोदर बाहेरुन भाजपाला पाठिंबा जाहीर केला. तो पाठिंबा जाहीर करत असताना मी स्वतः ‘सिल्वर ओक’ वरील बैठकीला उपस्थित होतो. या बैठकीला छगन भुजबळ, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार होते. त्या बैठकीमध्ये जयंत पाटील नव्हते, त्यामुळे त्यांना काही गोष्टी माहित नसतील.

२०१४ मध्ये लोकसभेच्या आधीसुद्धा १६, १६, १६ अशा जागांचं वाटप झालेले होते.
नंतर आम्ही २०१६- २०१७ मध्ये सत्तेत सहभागी होणार होतो, त्यावेळी जयंत पाटील
यांना कोणत खातं मिळणार हे माहित होतं. त्यामुळे अशा गोष्टींची टीका टिप्पणी करण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगाव्या.

मलाही अनेक गोष्टी ज्ञात आहेत. विनाकारण अजित पवार यांना विलन करण्याचा जर कोण प्रयत्न
करणार असेल तर पक्षातील अनेक गोष्टी ज्या घडल्या आहेत, त्या सांगाव्या लागतील”,
असा इशारा सुनिल तटकरे यांनी जयंत पाटील यांना दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शायना एनसी प्रकरणी शरद पवारांकडून अरविंद सावंत यांची पाठराखण; म्हणाले –
‘अरविंद सावंत यांचं वक्तव्य वैयक्तिक हल्ला होत नाही’

Sharad Pawar News | ‘सत्तेसाठी आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – ‘सन 1980 ची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही’

You may have missed