Sunil Tatkare On Mahendra Thorve | आमदार महेंद्र थोरवेंच्या टीकेला तटकरे, अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले – “महेंद्र थोरवेला मी मोजत नाही”
रायगड: Sunil Tatkare On Mahendra Thorve | खोपोली (Khopoli) इथं आयोजित पक्ष प्रवेश मेळाव्यात बोलताना शिवसेना शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा विश्वासघातकी पक्ष असल्याची टीका केली होती. जर तुम्हाला आमच्या विरोधात लढायचे असेल तर जाहीरपणे लढा, पण महायुतीत राहून गद्दारी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिला होता. (Sunil Tatkare On Mahendra Thorve)
राष्ट्रवादी ही घात करणारी पार्टी आहे हे मी जाहीरपणे सांगतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासघात करणे हेच त्यांचे काम आहे, जे आपण पाहतोय. त्यांच नेतृत्वच विश्वासघातकी आहे, जिल्ह्याचे जे नेतृत्व लाभले आहे तेच विश्वासघातकी आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे (Ajit Pawar NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी निशाणा साधला होता.
या टीकेला आता सुनील तटकरे आणि अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तटकरे म्हणाले, महेंद्र थोरवेला मी मोजत नाही. माझे स्थानिक नेते त्याला उत्तर देतील असे म्हंटले आहे.
तर अजित पवार म्हणाले, इतर लोक काय बोलतील त्याच्याशी मला काही घेणे देणे नाही. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे, भाजपचे प्रमुख बावनकुळे आणि फडणवीस यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देतो, बाकीच्यांकडे नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर आता महेंद्र थोरवे काय पलटवार करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Water Supply | पुणेकरांनो पाणी जपून वापरा; गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद