Sunny Vinayak Nimhan | कार्यसम्राट मोफत महा – आरोग्य शिबीर ! एकाच ठिकाणी तपासणीपासून शस्रक्रियेपर्यंत मोफत सर्वकाही; रूग्णांनी लाभ घेण्याचे आयोजक सनी निम्हण यांचे आवाहन

Maha - Health Camp

पुणे : Sunny Vinayak Nimhan | भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची “स्वस्थ ग्राम – स्वस्थ भारत” या संकल्पना सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तसेच मा.ना.गिरीशजी महाजन यांचे “रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण महाराष्ट्रातील गरजु व गरीब रुग्णांसाठी केले जाणारे सेवाकार्यसुध्दा समाजासाठी अतिशय मोलाचे आहे. या पार्श्वभुमीवर मा.ना.गिरीशजी महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पुणे मतदारसंघातील गरजु रुग्णांच्या सेवेसाठी दिवंगत कार्यसम्राट आमदार विनायकजी निम्हण यांच्या जयंतीनिमीत्त सोमेश्वर फॉऊंउेशन (Someshwar Foundation Pune), पुणे यांनी दिनांक 04 ऑगस्ट, 2024 रोजी ‘कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीर’ कृषी महाविद्यालय मैदान- भोसले नगर, पुणे येथे आयोजित केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या शिबीराची सुरवात 22 जुलै पासून होणार आहे. पहिला टप्पा: दिनांक 22 जुलै ते 28 जुलै2024 पर्यंत घरोघरी जाऊन नागरिकांची उंची, वजन, रक्तदाब तपासणी करून माहिती संकलन केले जाणार आहे. दुसरा टप्पा: २७ जुलै ते २ आॕगस्ट या कालावधीत शिवाजीनगर पासून पाषाण, सोमेश्वरवाडी पर्यंत ३६ ठिकाणी आरोग्य केंद्र उभारूण पूर्व तपासणी, प्राथमिक उपचार, इसीजी, रक्त, लघवी तपासणी, सोनोग्राफी, एक्स रे, टूडी इको, तणाव तपासणी व मुख्य शिबीराची नोंदणी केली जाईल. तिसरा टप्पा ‘मुख्य शिबीर’ ४ ऑगस्ट’ला होणार असून मान्यवरांच्या उपस्थितील शिबीराचे उदघाटन शासकीय कृषी महाविद्यालय मैदान, सिंचन नगर, शिवाजीनगर या ठिकाणी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी सायं ४ वाजेपर्यंत जगविख्यात डॉक्टरांचा सल्ला, तपासणी, औषधोपचार केले जाणार आहेत. चौथा टप्पा: ५ ऑगस्ट ते ५ ऑक्टोंबर या दरम्यान महाआरोग्य शिबीर पश्चात शिबीरात शस्रक्रिया अथवा उपचार याकरिता नोंद किंवा निवड करण्यात आलेल्या रूग्णांना लाभ देणेकामी उपायोजना व कार्यपूर्ती

लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक 04 ऑग्स्ट 2024 रोजी, सकाळी 9 वाजता कृषी महाविद्यालयाचे मैदान, सिंचन नगर, भोसलेनगर, पुणे याठिकाणी कार्यसम्राट मोफत महा – आरोग्य शिबीराचे उदघाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री मा.ना. श्री.अजितदादा पवार हे असणार आहेत. प्रमख पाहुणे नागरी विमान वाहतूक आणि सहकार मंत्रालयाचे राज्यमंत्री, मा. ना. श्री. मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.श्री.चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजय वडेट्टीवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते सचिन अहिर, खासदार अमोल कोल्हे तसेच पुणे शहरातील सर्व आमदार, माजी नगरसेवक आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित असणार आहेत. (Sunny Vinayak Nimhan)

शिबीराचे वैशिष्टे –

  • विनामुल्य आरोग्य शिबीरात सर्व पॅथींचा समावेश.
    ॲलोपॅथी, आयुष (आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, युनानी), दंतचिकीत्सा इत्यादी तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया व औषधी विनामुल्य उपलब्ध
  • देशातील नामवंत तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती.
    डॉ.तात्यासाहेब लहाने, डॉ.वाकणकर, डॉ.गौतम भंसाळी, डॉ.रमाकांत देशपांडे, डॉ.के.एच संचेती, डॉ.विकास महात्मे, डॉ.यशराज पाटील, डॉ.अजय चंदनवाले, डॉ.संजयकुमार तांबे, डॉ.जगन्नाथ दिक्षीत, डॉ.अमित मायदेव, डॉ.अजय चौरसिया इत्यादी…..
  • विविध आजारांवरील उपचार
    एकुण 80 बाह्यरुग्ण कक्षांचा समावेश
    सदरील बाह्यरुग्ण कक्षांत आयुष, नेत्रचिकीत्सा, दंतचिकीत्सा, कान नाक घसा, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, हृदयरोग, श्वसनविकार, मुत्ररोग, प्लॉस्टिक सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, अनुंवशीक विकार, कर्करोग, लठ्ठपणा, वृध्द जनरल तपासणी, मतीमंद रुग्ण तपासणी, मनोविकार, मेंदुरोग इत्यादी आजांरावर विनामुल्य औषधोपचार व शस्त्रक्रिया
    त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या आवश्यक रक्त व लघवी चाचणी नमुणे संकलन, तसेच इ.सी.जी, मॅमोग्राफी, पी.एफ.टी., बी.एम.डी. तपासणी
  • गरजु रुग्णांना मोफत वितरण*
    कृत्रिम अवयव, चष्मे, वृध्दकाठी, अंधकाठी, दिव्यांग साहित्य, कर्णयंत्र, दातांच्या कवळया यांचे नोंदणीनुसार वाटप
  • आपतकालीन व्यवस्थेमध्ये कार्डीयाक रुग्णवाहीका, रुग्णवाहीका, अग्निशमन वाहन, रुग्ण स्ट्रेचर, व्हिलचेअर यांचा समावेश
  • सर्व रुग्ण व रुग्णनातेवाईक यांना मोफत अल्पोपहार व भोजनाची सोय.

सर्व नागरीकांनी या बहुमुल्य संधीचा लाभ घ्यावा असे आयोजक सोमेश्वर फॉऊंउेशन, पुणे तसेच निमंत्रक माजी नगरसेवक मा.श्री.सनी विनायक निम्हण यांनी आवाहान केले आहे. गरजू नागरिकांनी आधिक माहितीसाठी 8308123555 या नंबरवर संपर्क करावा किंवा www.sunnynimhan.com या वेबसाईटवर नोंदणी करावी.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed