Supreme Court On Alimony Muslim Women | मुस्लिम महिला सुद्धा पतीकडून मागू शकतात पोटगी, कोर्टाने सुनावला ‘सुप्रीम’ निर्णय; CrPC कलम 125 चा दिला संदर्भ

Muslim Women

नवी दिल्ली : Supreme Court On Alimony Muslim Women | सुप्रीम कोर्टाने आज म्हटले की, तलाक घेतलेल्या मुस्लिम महिला सुद्धा सीआरपीसीचे कलम १२५ अंतर्गत पोटगीसाठी आपल्या पतीविरूद्ध याचिका दाखल करू शकतात. सुप्रीम कोर्टाने आज या प्रकरणावर महत्वाचा निर्णय सुनावताना म्हटले की, हा कायदा प्रत्येक धर्मातील महिलांसाठी लागू होतो.

न्या. बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांनी या प्रकरणावर सुनावणी केली. दोन्ही न्यायमूर्तींनी वेगवेगळे निर्णय सुनावले.

तेलंगाना हायकोर्टाने मोहम्मद अब्दुल समद यांना आपल्या घटस्फोटीत पत्नीला दरमहिना १० हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता, त्याविरुद्ध ते सुप्रीम कोर्टात पोहोचले. मोहम्मद अब्दुल समद यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुप्रिम कोर्टाने निर्णय सुनावला. (Supreme Court On Alimony Muslim Women)

काय आहे सीआरपीसी कलम ?

सीआरपीसी कलम १२५ मध्ये पत्नी, संतती आणि आई-वडिलांच्या भरणपोषणाबाबत माहिती दिली आहे. या कलमानुसार, पती, पिता अथवा मुलांवर अवलंबून असलेली पत्नी, आई-वडील अथवा मुले पोटगीसाठी दावा तेव्हा करू शकतात जेव्हा त्यांच्याकडे उपजिविकेचे कोणतेही साधन नसेल.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed