Supreme Court On Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेवर सुप्रीम कोर्टाचा संताप, म्हणाले – ‘यासाठी तुमच्याकडे पैसे पण नुकसान भरपाईसाठी…’

दिल्ली: Supreme Court On Ladki Bahin Yojana| वन जमिनीवर इमारतींचे बांधकाम आणि बाधित खासगी पक्षांना नुकसान भरपाई देण्याबाबत उत्तर न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला फटकारले. सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की महाराष्ट्र सरकारकडे ‘लाडकी बहीण’ आणि ‘लाडका भाऊ’ सारख्या योजनांतर्गत मोफत वाटप करण्यासाठी निधी आहे, परंतु जमिनीच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी निधी नाही. (Supreme Court On Ladki Bahin Yojana)
न्यायमूर्ती बी.आर गवई, न्यायमूर्ती के.व्ही विश्वनाथन आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला उत्तर दाखल करण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आणि आदेशाचे पालन न केल्यास मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागेल, असे सांगितले. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील वन जमिनीवर इमारती बांधण्या संदर्भातील एका खटल्याची सुनावणी सुरू होती.
राज्य सरकारने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या जमिनीचा ताबा सर्वोच्च न्यायालयाकडे नेण्यात एका खासगी पक्षाला यश आले आहे. महाराष्ट्र सरकारने दावा केला आहे की, ही जमीन शस्त्रास्त्र संशोधन विकास आस्थापना या केंद्राच्या संरक्षण विभागाच्या ताब्यात होती.
राज्य सरकारने सांगितले की ARDEI ने ताब्यात घेतलेली जमीन नंतर एका खाजगी पक्षाला दुसऱ्या
जमिनीच्या बदल्यात देण्यात आली. मात्र, खासगी पक्षाला दिलेली जमीन वन जमीन म्हणून अधिसूचित करण्यात आल्याचे नंतर उघड झाले.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारताना म्हंटले की, आमच्या २३ जुलै च्या आदेशानुसार आम्ही तुम्हाला प्रतिज्ञापत्रावर जमिनीच्या मालकी बाबत तुमची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्ही तुमचा जबाब नोंदवणार नसाल तर तुमच्या मुख्य सचिवांना पुढच्या वेळी हजर राहण्यास सांगू, तुमच्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ अंतर्गत मोफत वस्तू वाटण्यासाठी पैसे आहेत. मात्र जमिनीच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी निधी नाही, अशा शब्दात कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी
Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन
Pune ACB Trap Case | अबब! दीड लाखांसाठी 50 हजारांची मागितली लाच; PMRDA चे अभियंता,
इंजिनिअरसह तिघांना अटक
Hadapsar Pune Crime News | हडपसरमधील ‘त्या’ रिव्हर्स थरारमधील कारण आले पुढे;
पिकअप वाहन चालकावर गुन्हा दाखल