Supriya Sule Beed Visit | माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार, सुप्रिया सुळेंची मस्साजोगमध्ये घोषणा, मृत संतोष देशमुखांच्या आईने हंबरडा फोडला, ”माझा राम गेला…”

Supriya Sule

बीड : Supriya Sule Beed Visit | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बीडच्या मस्साजोग गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी माणुसकीच्या नात्याने हा लढा लढणार असल्याची घोषणा केली. दरम्यान, सुप्रिया सुळे देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करत असताना मृत संतोष देशमुखांच्या आईने मुलाच्या वियोगाने हंबरडा फोडला. माझा राम गेला, एकटा लक्ष्मण कुठवर धावणार? असे या मातेने म्हणताच संपूर्ण गाव गहिवरून गेला. यावेळी सुळे यांनी या मातेला अधार देण्याचा प्रयत्न केला. (Santosh Deshmukh Murder Case)

यावेळी मस्साजोगचे ग्रामस्थ प्रशासनावर संतप्त झाले होते. आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, एक आरोपी फरार आहे, तपास संथगतीने होतोय, असे म्हणत ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त केला.

मृत संतोष देशमुख यांची आई म्हणाली, माझं लेकरू कुठं शोधू? मारेकर्‍यांना लेकरं, आई-वडिल नाहीत का? एकटं माणूस पाहून मारलं, त्यांना काहीच वाटलं नाही का? ज्या दिवशी हत्या झाली, त्यादिवशी मी त्याची वाट पाहत होते. स्वयंपाक केलेला होता. त्याला फोन केला. पाचच रिंग वाजल्या आणि नंतर फोन बंद झाला, माझ्या मुलाचा चेहरासुद्धा पाहु दिला नाही, असे म्हणत त्या माऊलीने हंबरडा फोडला.

तर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सुप्रिया सुळे यांना सांगितले की, पीएसआय राजेश पाटील हा खरा आरोपी आहे. आरोपींनी वॉचमनला मारहाण केली. अशोक मोहितेला आरोपींच्या मित्रांनी मारहाण केली. पीएसआय पाटील याच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

यावेळी सुप्रिया सुळे यांनी देशमुख कुटुंबिय आणि ग्रामस्थांना आधार देत आश्वासित केले. त्या म्हणाल्या, देशमुख कुटुंबाला 69 दिवसांपासून न्याय मिळाला नाही. माणुसकीच्या नात्याने मी हा लढा लढणार आहे. आईचे-बहिणीचे दुःख समजू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून लवकर न्यायाची अपेक्षा होती. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने चालेल, हे अपेक्षित आहे. मी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे पदर पसरेन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी केली आहे. खासदार बजरंग सोनवणे आणि मी अमित शाह यांची भेट घेतली होती, अशी माहिती सुळे यांनी दिली. तर खासदार सोनावणे म्हणाले, आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या लोकांची सत्तेची मस्ती उतरल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. येथील गुंडगिरी थांबलीच पाहिजे. (Supriya Sule Beed Visit)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Gold-Silver Rate Today | चांदीच्या दरात आज आश्चर्यकारक घसरण, जाणून घ्या काय आहे सोन्याचा दर,
दिल्लीपासून मुंबईपर्यंतचे दर जाणून घ्या

Market Yard Pune Police News | छोट्याश्या खोलीत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग;
मार्केटयार्ड पोलिसांनी आंबेडकर नगरात कारवाई, 5 मोठे तर 12 छोटे गॅस सिलेंडर जप्त

Sanjay Raut Critisice Sharad Pawar | शरद पवारांनी एकनाथ शिंदेंचा सत्कार केल्याने संजय राऊतांचा संताप,
म्हणाले ”कोण कोणाला टोप्या घातलंय आणि…”

Pune Crime News | पुणे : सासूकडून सून आणि नातवाचा छळ

You may have missed