Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य
जळगाव : Supriya Sule On Ajit Pawar | मी भावासोबत (अजित पवार) गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते. पण मी माझ्या ८० वर्षाच्या स्वाभिमानी वडिलांसोबत उभी राहिले याचा मला अभिमान असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या (Sharad Pawar NCP) खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
महिलांना सत्तेपेक्षा स्वाभिमान जास्त महत्वाचा असतो असेही सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आता अनेकजण माफी मागत आहेत, पण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा हा मनाने मोठा असतो पण माफी मागणारे स्वतःची चूक मान्य करत असतील तर ते कोर्टातील केस मागे घेणार का? सध्या न्यायालयात सुरु असलेली लढाई ही फक्त पक्ष आणि चिन्हाची नाही तर ती नैतिकतेची लढाई आहे. कारण पक्ष आणि चिन्ह ओरबाडून घेणे हा आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजींचा घात असल्याचे सुळे म्हणाल्या.
एक देश एक निवडणुकीचा नारा देणारे सरकार महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलत आहे. याचा अर्थ सरकार डर रही है, कारण राज्यातील महायुतीचे नेते निष्क्रिय असल्यामुळेच पंतप्रधानांना महाराष्ट्रात यावे लागत आहे. असे असेल तर तो महाविकास आघाडीचा विजय असल्याचे सुळे म्हणाल्या. दोन पक्ष फोडण्याचे देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना कौतुक वाटत असेल तर ते दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले.
मी पक्षाकडे खासदारकीचे तिकीट सोडून काहीही मागत नव्हते कारण संसदेत पहिला नंबर येत
असल्यामुळे मी मेरिटवर खासदारकीचे तिकिट मागितले, तर तो गुन्हा आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
पुढील ९० दिवस आपल्याला स्वाभिमानासाठी लढायचे आहे.
आपली सत्ता आल्यानंतर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हमीभावासंबंधीचा घेईल,
असे आश्वासनही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा