Supriya Sule On Ajit Pawar | ‘बारामती मतदारसंघ फक्त शरद पवारांना कळतो’, सुप्रिया सुळेंचे अजित पवारांवर टीकास्त्र

Supriya Sule-Ajit Pawar

बारामती: Supriya Sule On Ajit Pawar | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार (Yugendra Pawar) तुतारी (Tutari) चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. (Baramati Assembly Election 2024)

दरम्यान आजपासून युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. कन्हेरी येथे झालेल्या प्रचारसभेत सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रात सध्या बरेच कार्यक्रम सुरु आहेत. अनेक ठिकाणी लागलेले बॅनर पाहते. त्या बॅनरवर लिहिले आहे की, चिन्ह तुमचे नाही. या चिन्हाची लढाई न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे ते विसरले असतील. मात्र, मी विसरलेले नाही. पक्ष आणि चिन्ह हिसकावण्याचे काम अदृष्य शक्तीने केले, असे सुप्रिया सुळेयांनी म्हंटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या,” कॉपी करून पास होण्यात काय मजा? अभ्यास करुन पास होऊन सर्टिफिकेट घेण्याचा आनंद वेगळा असतो. मला वाटायचे की सर्वजण गेले, आता आपले काय होणार? लोकसभा निवडणुकीत मतदारसंघात दौरे करायचे. तेव्हा मला प्रश्न पडायचे की काय होणार?

मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत समजले की, ताकद फक्त जनतेत असते आणि ते जनतेने
लोकसभेला दाखवून दिले. कोणी काहीही म्हटले तरी बारामती मतदारसंघ ना मला कळतो,
ना त्यांना कळतो. हा मतदारसंघ फक्त शरद पवारांना कळतो”, असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Purandar Assembly Election 2024 | पुरंदर मतदारसंघात काँग्रेसची पुनरावृत्ती की विजय शिवतारे गड जिंकणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Nirbhay Bano Campaigns | ‘निर्भय बनो’च्या सभा आता विधानसभेलाही होणार; मविआला सशर्त पाठिंबा; असीम सरोदे म्हणाले,”लाडकी नव्हे धाडसी बहीण योजना हवी”

Mantarwadi Pune Fire News | मंतरवाडीतील पेंटच्या गोडावूनला मध्यरात्री भीषण आग ! दोन टेम्पो, दोन दुचाकी ही आगीच्या भक्ष्यस्थानी (Video)

You may have missed