Supriya Sule On Ajit Pawar | ‘प्रेमानं मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह ही दिलं असतं’; लाडक्या बहिणीचा अजित पवारांना संदेश

कराड : Supriya Sule On Ajit Pawar | खासदार सुप्रिया सुळे यांनी आज कराड येथे गुरुपौर्णिमेनिमित्त (Guru Purnima) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी (Yashwantrao Chavan Samadhi) अभिवादन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. एक आदर्श गुरू, सुपुत्र, पती, सहकारी, कवी, लेखक व द्रष्टा नेता म्हणून त्यांची देशात ओळख आहे. त्यांनी शुन्यातून विश्व निर्मिले. त्यांच्या विचारांवरच आम्ही मार्गक्रमण करत असल्याचा विश्वास सुळे यांनी दिला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil), आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) , राष्ट्रवादी काँग्रसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “लोकसभेत आम्ही जिंकायला हवे होते पण दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारी यांच्यामध्ये आमचे खूप नुकसान झाले. कदाचित दुसरी तुतारी नसती, तर आज आमच्या नऊ सीट लोकसभेवर निवडून आल्या असत्या पण रडीचा डाव”, असे म्हणत भाजपावर (BJP) सुळेंनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. (Supriya Sule On Ajit Pawar)
अजित पवारांवर टीका करीत सुळे पुढे म्हणाल्या, “कशासाठी लढायचे ! काय निष्पन्न होते भांडणातून, काय निष्पन्न होत नाही, त्यातून फक्त कुटुता निर्माण होते. मला सांगितले असते पक्ष, चिन्ह पाहिजे आहे. दिले असते.
शून्यातून आयुष्य सुरू केले असत. आई-वडिलांनी शिकवलं कशाला?
जर अडचणीच्या काळात आई-वडिलांसोबत उभे राहायचे नाही तर मग कधी उभे राहायचे?”
असे म्हणत सुळेंनी थेट वहिनी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांना टोला लगावला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा