Supriya Sule On Ajit Pawar | ‘तुम्ही केव्हा उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम’, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Supriya Sule-Ajit Pawar

पुरंदर : Supriya Sule On Ajit Pawar | महायुती सरकारने (Mahayuti Govt) जाहीर केलेल्या जाहीर केलेल्या योजनेतील लाडकी बहीण योजनेवरून (Ladki Bahin Yojana) शरद पवार गट (Sharad Pawar NCP) आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) लगबग सुरु झालेली आहे. सर्वपक्षीयांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार मी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो, असे वक्तव्य माध्यमात करत आहे .

यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आज काही लोकांचा एक डायलॉग ‘मी सकाळी लवकर उठतो’ माझ्यामुळे बंद झाला. कष्ट तर सगळेच करत असतात, कोणी कोणावर उपकार करत नाही.

सकाळी लवकर दुधवाला पण उठतो?, तुम्ही किती वाजता उठता हा तुमच्या बायकोचा प्रॉब्लम आहे कारण तिला तुमच्यासाठी चहा करायला लागतो. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली.सुप्रिया सुळे पुरंदर येथे बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या, आज तुम्ही दिवस-रात्र काम करता असं सांगत आहे. मात्र यासाठी आम्ही तुम्हाला आग्रह केला होता का?, तुम्हाला आमदार-खासदार व्हायचं आहे. आज कष्ट तर सगळेच करत आहेत, मात्र माझ्यामुळे एक डायलॉग बंद झाला. पवार साहेबांनी असं कधी भाषण केले आहे का? तुम्ही लवकर उठता म्हणून दररोज भाषण करत सुटता का? असा सवाल देखील सुप्रिया सुळेंनी विचारला. (Supriya Sule On Ajit Pawar)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बाणेर-बालेवाडी- पाषाणमधील समस्यांसंदर्भात चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत बैठक

Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Pune Ganeshotsav | गणेश मंडळाला 100 वॉटपेक्षा जास्त क्षमतेचे ध्वनिक्षेपक वापरण्यास मनाई; ढोल-ताशा पथकावरही निर्बंध

Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद

You may have missed